Beat The Heat in Summer season
Beat The Heat in Summer season Saam Tv
लाईफस्टाईल

Beat The Heat in Summer season : कडाक्याच्या उन्हाळ्यात दिसा स्टायलिश, 5 ट्रेंडी फॅशनेबल आउटफिट करा ट्राय

कोमल दामुद्रे

Summer Fashion Trend : हिवाळा आणि पावसाळ्यात आपल्याला खरेतर उबदार कपडे हवे असतात. पण उन्हाळा म्हटलं की, या ऋतूमध्ये आपल्याला सुती कपडे घालण्याची जास्त गरज असते. उन्हाळयात जसजसे तापमान वाढत जाईल, तसतसे अधिक उन्हामुळे साधारण कपडे शरीरातील उष्णता अधिक वाढवतील. म्हणून उन्हाळी कपडे घालणे केंव्हाही योग्यच.

सध्या ट्रेंड मध्ये असलेले चमकदार रंग, पॅटर्न्स आणि टेक्श्चर पासून ते क्लासिक अमेरिकाना आणि काही नॉस्टॅल्जिक थ्रोबॅक ऑउटफिट्स (Outfits) हे तुम्हाला उन्हापासून बचाव करतीलच सोबत तुमचा लुक सुद्धा मोहक करण्यास मदत करतील. चला तर आज जाणून घेऊयात उन्हाळी कपडे (Clothes) आणि त्याची फॅशन.

1. फ्लोरल ड्रेसेस + डेनिम जॅकेट

Flower dress

तुमच्या हॉट गुलाबी ड्रेसवर डेनिम जॅकेट परिधान करा. तुमची संध्याकाळ आणखी सुंदर बनवण्यासाठी तुम्हाला फक्त उन्हाळ्यातील फुलांच्या गुलाबी रंगाच्या ड्रेसची गरज आहे. डोक्यापासून ते पायाच्या अंगठ्या पर्यंत पिंक लूक उन्हाळ्यातील ट्रेंड असेल कारण त्यावर ऍक्सेसरीझ वापरणे सोपे असेल.

2. फ्लोरल जम्प्स

flower jumps

फ्लोरल ट्रेंडचा आनंद घेण्यासाठी उन्हाळा हा योग्य हंगाम आहे आणि फुलांच्या जंपसूटपेक्षा आणखी कोणता पर्याय असू शकत नाही का? जंपसूट मध्ये विविधता खूप आहे आणि ते घालण्यास देखील अगदी सोपे असतात. ते आपण वर किंवा खाली असे दोन्ही मॅच करू शकतो. शिवाय ते चिपकणारे नसल्याने उन्हाळ्यात अगदी आरामदायक अनुभव देतात.

3. क्रॉप टॉप

crop top

क्रॉप टॉप हे उन्हाळ्यातील (Summer) सदाबहार ट्रेंड असून यंदाही ते लोकप्रिय ठरत आहेत. याचा वापर अनेक पद्धतीने करता येतो. आणि ते साध्या ते बोल्ड रंगीत शैलीच्या श्रेणीमध्ये येतात. अधिक सुंदर दिसण्यासाठी ते जीन्स किंवा स्कर्टसह घालत येऊ शकतात किंवा धाडसी स्टाईल स्टेटमेंटसाठी नॅरो बॉटमसह परिधान केले जाऊ शकतात.

4. शॉर्ट्स आणि टँक टॉप

striped tak top

स्पायकरचा हा काळा आणि पांढरा स्ट्रीप टँक टॉप लुक एका दिवसाच्या सहलीसाठी किंवा कॅफे किंवा प्ले गेम स्टेशन मधील मजेदार संध्याकाळसाठी योग्य आहे. तुमचे पाय टॅनिंग होण्यापासून वाचवण्यासाठी आणि उन्हाळ्याचा लुक अधिक वाढवण्यासाठी हे टॉप लिनेन पँटसोबत घालू शकता.

5. ब्लॅक शॉर्ट

Black Shorts

हा काळा आणि हिरवा लूक संध्याकाळच्यावेळी खेळण्यासाठी योग्य पर्याय आहे. बीच लुकसाठी तुम्ही फ्लिप फ्लॉपमध्ये बदलू शकता. सूर्यास्ताचा आनंद घेण्यासाठी पुरुष तागाचे शॉर्ट्स पेस्टल रंगाच्या शर्टसह घालू शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: भाजप-मनसेच्या युतीत शिवसेनेचा खोडा; बाळा नांदगावकरांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

SCROLL FOR NEXT