Long weekend plan, August, Happy long weekend ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Long Weekend plan : ऑगस्ट महिन्यात एक दिवसाची रजा घ्या आणि आठवडाभर फिरा, असा बनवा प्लान

एक दिवस सुट्टी घेऊन आठवडाभर प्रवास करायचा असेल तर हा लेख जरूर वाचा.

कोमल दामुद्रे

Long Weekend Plan : आपण सगळेच आपल्या कामामुळे चिंतित असतो. काम करताना जर आपल्या मनात फिरण्याविषयीच्या गोष्टी आल्या की, आपण अधिक उत्सुक होऊ लागतो.

हे देखील पहा -

जर आपल्याला शनिवार रविवार सुट्टी असेल तर आपण फिरायला जाण्याचा नक्की विचार करु शकतो. कामाच्या ठिकाणी आपल्यावर कोणती जबाबदारी आहे का ते तपासून पहा. सुट्टी घेण्याआधी आपले अपूर्ण काम पूर्ण करुन जा. काम करताना आपण आपले काम किंवा महत्त्वाच्या गोष्टी कोठे ठेवल्या आहेत याची नोंद देखील ठेवायला विसरु नका. आपण ऑगस्ट महिन्यात सुट्टी कशी घेऊ शकतो व त्याचा आनंद कसा लुटू शकतो हे जाणून घ्या.

११ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट पर्यंत फिरण्याचा प्लान बनवण्याचा प्रयत्न करत असाल तर तो आपण सहजपणे बनवू शकतो. त्यासाठी आपल्याला फक्त १ दिवसाची सुट्टी गरजेची आहे. १२ ऑगस्टला सुट्टी घेतल्यास आपल्याला ५ दिवस लागोपाठ सुट्टया मिळू शकतील व आपण फिरण्याचा (Trip) प्लानही व्यवस्थित बनवू शकतो.

११ ऑगस्टला रक्षाबंधन, १२ ऑगस्ट ला सुट्टी घेणे, १३ ऑगस्ट ला विकेंड सुट्टी , १४ ऑगस्ट ला रविवार व १५ ऑगस्ट ला स्वतंत्र दिवस सुट्टी या पाच दिवसात आपल्या सुट्ट्या मिळत आहेत. अशावेळी आपण फिरण्याचा प्लान बनवू शकतो.

जर आपण दिल्लीच्या आसपास फिरण्याचा प्लान करत असाल तर त्याच्या जवळपास बरेच असे ठिकाण आहेत ज्यामुळे आपल्याला निसर्गाचा (Nature) आनंद घेऊ शकतो. तसेच जर आपण उत्तराखंडला जाण्याचा विचार करत असू तर आपण शिमला, कुफरी, मनाली, कुल्लू इत्यादी ठिकाणी जाऊ शकता. त्याचप्रमाणे, जर तुम्ही राजस्थानला भेट देण्याचा विचार करत असाल तर तुम्ही जयपूर, उदयपूर, जैसलमेर, बिकानेर इत्यादी ठिकाणी जाऊ शकता.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HAL Recruitment: हिंदुस्तान एयरोनॉटिक्समध्ये नोकरीची सुवर्णसंधी; मिळणार ६०,००० रुपये पगार; अशा पद्धतीने करा अर्ज

Vaibhav-Irina : देखो ना खुद को जरा... इरिना-वैभवचा जिममध्ये रोमँटिक डान्स; चाहते म्हणाले, 'फॉरेनची पाटलीण'

New Family Pension Rule: आई- बाबांची पेन्शन मुलांना मिळते का? लग्न झालेल्या मुलीचा अधिकार किती?

Maharashtra News Live Updates :शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील महाराष्ट्र पिंजून काढणार

Maharashtra Politics: माझी भीती का? एवढी व्यूहरचना कशासाठी? धनंजय मुंडेचा थेट शरद पवारांना इशारा

SCROLL FOR NEXT