What damages liver besides sugar  saam tv
लाईफस्टाईल

Liver damage habits : फक्त साखरच नाही तर या ५ वाईट सवयी लिव्हर करतील खराब

What damages liver besides sugar : लिव्हर सिरोसिसची समस्या टाळण्यासाठी आपल्या जीवनशैलीमध्ये काही खास बदल करावे लागतात. यामध्ये तुम्हाला आहारामध्ये बदल करणं गरजेचं आहे. अशावेळी साखरेव्यतिरिक्त कोणते पदार्थ तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरतात ते पाहूयात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आपलं यकृत (liver) हे शरीरातील सर्वात महत्त्वाच्या अवयवांपैकी एक मानलं जातं. लिव्हरचं काम शरीर डिटॉक्स करणं, अन्न पचायला मदत करणं त्याचप्रमाणे चयापचय क्रिया नियंत्रित करणं आहे. सध्याच्या काळात चुकीच्या जीवनशैलीमुळे लिव्हरची समस्या म्हणजे फॅटी लिव्हर (fatty liver) चा त्रास अनेकांमध्ये दिसून येतो.

फॅटी लिव्हरची समस्या चिंताजनक नाहीये. मात्र जर त्याचं रूपांतर लिव्हर सिरोसिसमध्ये (liver cirrhosis) झालं तर ही समस्या जीवघेणी ठरू शकते. लिव्हर सिरोसिस ही एक गंभीर स्थिती असून यामध्ये जिथे निरोगी यकृत पेशींची जागा scar पेशी घेतात. यामुळे यकृताच्या कार्यावर परिणाम होते.

दारूचं सेवन

दारूचं सेवन हे यकृतासाठी हानिकारक असतं. जास्त प्रमाणात दारू प्यायल्याने यकृताला ती शरीराबाहेर काढण्यासाठी खूप जास्त काम करावं लागतं. यामुळे यकृताची शरीरातील इतर विषारी पदार्थ बाहेर काढण्याची क्षमता कमी होऊ लागते. परिणामी तुम्हाला फॅटी लिव्हर , यकृताची सूज आणि लिव्हर सिरोसिस देखील होऊ शकते.

पेनकिलर्स

अनेक लोक पॅरासिटामॉल सारख्या पेनकिलर्सचा वापर सर्रासपणे करतात. मात्र या औषधांचा जास्त प्रमाणात किंवा दीर्घकाळ वापर केल्यास यकृतासाठी ते धोकादायक ठरू शकतं. अगदी कमी प्रमाणात जास्त डोस घेतल्यास देखील यकृताला गंभीर नुकसान होऊ शकतं.

जंक फूड

चिप्स, फास्ट फूड आणि तेलात तळलेले पदार्थ यांसारख्या पदार्थांमध्ये unhealthy trans fats आणि प्रिझर्वेटिव्ह्ज मोठ्या प्रमाणात असतात. हे unhealthy fats यकृतामध्ये चरबी जमा होण्यास कारणीभूत ठरतात. ज्यामुळे फॅटी लिव्हर आजाराचा धोका वाढतो.

डिहायड्रेशन

शरीरात पाण्याची कमतरता हे देखील तुमच्या शरीरासाठी धोकादायक ठरू शकतं. ज्यावेळी तुम्ही पुरेश्या प्रमाणात पाणी पित नाही तेव्हा हे विषारी पदार्थ शरीरात जमा होतात आणि यकृतावर ताण येतो. दररोज किमान ८ ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे. याशिवाय तुम्ही हर्बल टी आणि लिंबू पाणी देखील पिऊ शकता.

रेड मीट

रेड मीट जास्त प्रमाणात खाल्ल्याने यकृताला नुकसान पोहोचू शकतं. यांमध्ये सॅच्युरेटेड फॅट्स आणि विविध एडिटिव्ह्ज (additives) जास्त प्रमाणात असतं. यामुळे यकृतामध्ये सूज येऊ शकते आणि यकृताच्या आजारांचा धोका वाढतो.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhendwal Bhavishyvani: यावर्षी पाऊस कसा राहिल? शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा; देशावर आर्थिक संकट, वाचा भेंडवळच्या घटमांडणीचा A टू Z अंदाज

Maharashtra News Live Update: भिवंडीच्या मूलचंद कंपाऊंडमध्ये ऑइलच्या गोदामाला भीषण आग

High Blood Pressure : हाय BP च्या रुग्णांसाठी 'हा' ज्यूस ठरतो वरदान, आताच डाएटमध्ये करा समावेश

Weight Loss Diet: डाएटमध्ये भाकरीसोबत खा ही एक भाजी, फॅट होईल ७ दिवसातच कमी

Maharashtra Government: राज्य सरकारचा मोठा निर्णय! सरकारी कर्मचाऱ्यांसाठीचा २२ वर्षांपूर्वीचा नियम बदलला

SCROLL FOR NEXT