Leukemia Disease Saam Tv
लाईफस्टाईल

Leukemia Disease : ल्युकेमिया आजारापासून मुलांना वाचवण्यासाठी 'हे' पदार्थ त्यांच्या ताटात वाढा !

नुकतेच ल्युकेमिया या आजारापासून एका बालकलाकराचा मृत्यू झाला पण तो आजार कसा होतो व त्या आजारांपासून आपले संरक्षण कसे करावे हे प्रत्येकाला कळत नाही.

कोमल दामुद्रे

Leukemia Disease : हल्ली अनेक संसर्गजन्य व सामान्य आजारांने मुलांना ग्रासले आहे त्यामुळे पालकांना सतत मुलांची (Child) काळजी वाटते. नुकतेच ल्युकेमिया या आजारापासून एका बालकलाकराचा मृत्यू झाला पण तो आजार कसा होतो व त्या आजारांपासून आपले संरक्षण कसे करावे हे प्रत्येकाला कळत नाही. (Health Tips)

ल्युकेमिया हा एक रक्ताचा कर्करोग (Cancer) आहे. ज्यामध्ये शरीरातील पांढऱ्या रक्तपेशी मोठ्या प्रमाणात वाढतात. यामुळे रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती देखील कमकुवत होत जाते.

यासाठी काही विशिष्ट प्रकारच्या सेवन केल्यास ल्युकेमियाचा धोका कमी करण्यास मदत मिळू शकते असे तज्ज्ञांचे मत आहे. जाणून घेऊया त्याबद्दल (Latest Marathi News)

1. पाणी

Water

मुलांनी दररोज पुरेसे पाणी पिण्याची खात्री पालकांनी करावी. या आजारांना तोंड देत असलेल्या लोकांसाठी हायड्रेटेड राहणे महत्वाचे आहे कारण ते शरीर उच्च कार्यक्षमतेवर चालू ठेवते तसेच शरीराचे तापमान राखते. शरीर चांगले हायड्रेटेड ठेवल्याने तुमची संक्रमणास प्रतिकारशक्ती देखील वाढेल. हे तुमच्या झोपेची गुणवत्ता देखील वाढवू शकते, जे निरोगी लाल रक्तपेशींच्या उत्पादनास प्रोत्साहन देते.

2. कोबी

Cabbage

ल्युकेमिया आजारापासून बचाव करण्यासाठी आहारामध्ये कोबीचा समावेश करावा. यातील पोषणतत्त्वांमुळे आपल्या शरीराचे गंभीर आजारांपासून संरक्षण होण्यास मदत मिळते. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार विविध प्रकारच्या कोबीचे सेवन करू शकता.

3. पालक

Spinach

शरीराला मुबलक प्रमाणात लोहाचा पुरवठा करणाऱ्या पालकपासून आपले कित्येक आजारांपासून संरक्षण होते. यामध्ये व्हिटॅमिन आणि खनिजांचेही प्रमाण भरपूर आहे. ज्यामुळे शरीराची कार्यप्रणाली अतिशय चांगल्या प्रकारे सुरू राहण्यास मदत मिळते. ल्युकेमियाचा धोका टाळण्यासाठी पालकचे सेवन करणं अतिशय फायदेशीर ठरू शकते. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहारामध्ये पालकचा समावेश करा. अ‍ॅनिमियाचा त्रास असणाऱ्यांनी पालकचे सेवन करावे.

4. ब्रोकोली

Broccoli

ब्रोकोलीचे सेवन केल्यास आरोग्याला अनेक फायदे होतात. ब्रोकोलीमध्ये प्रोटीन, अँटिऑक्सिडंट्स, कॅल्शियम, लोह, सेलेनियम, जीवनसत्त्व ए सोबत पॉलिफेनॉल असतात. याव्यतिरिक्त, त्यात फायबर आणि जीवनसत्त्व क देखील भरपूर आहे, जे आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे.

5. काले -

kale

काले या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात पौष्टिक गुणधर्म आहे. पालक प्रमाणेच दिसणाऱ्या या भाजीचे सेवन केल्यास आरोग्यास भरपूर प्रमाणात फायदे मिळतात. कालेमध्ये कॅल्शिअमचे प्रमाणही जास्त आहे. बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्यांनी या भाजीचा आहारामध्ये समावेश करावा. कालेमुळे पचनक्रिया सुरळीत राहते. या भाजीतील गुणधर्मामुळे हृदयविकारांपासूनही संरक्षण होण्यास मदत मिळते.

6. बोक चॉय -

Bok Choy

बोक चॉयमध्ये व्हिटॅमिन सी असते. ही एक अँटिऑक्सिडेंट आहे जे फ्री रॅडिकल्सशी लढण्यासाठी ओळखला जातो. सूर्यप्रकाश आणि प्रदूषणामुळे त्वचेला होणारे नुकसान कमी होण्यास मदत होऊ शकते. त्यात असणाऱ्या व्हिटॅमिन सी मुळे शरीराच्या नैसर्गिक कोलेजन उत्पादनात देखील भूमिका बजावते आणि वृध्दत्वाच्या चिन्हे जसे की बारीक रेषा आणि सुरकुत्या यांचा सामना करण्यास मदत करू शकते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : यवतमाळच्या घाटंजी तालुक्यात 2 पूरबळी; यवतमाळ जिल्ह्याला पावसाने झोडपलं

'पप्पा मला अ‍ॅडमिशन घेऊन द्या ना'; पैशांअभावी वडिलांचा थांबण्याचा सल्ला; घरी कुणी नसताना लेकीनं आयुष्य संपवलं

Nashik News: नाशिकमध्ये धो धो! गोदामातेची पुरातच आरती, भक्तांची मांदियाळी|VIDEO

Skin Care Tips: पावसाळ्यात ग्लोइंग त्वचा हवीये, मग फॉलो करा 'या' सिंपल टिप्स

Shubman Gill : शुभमन गिलकडून झाली मोठी चूक! भारताच्या कॅप्टनचा 'तो' व्हिडीओ लीक, बीसीसीआयला फटका बसणार?

SCROLL FOR NEXT