Leg Cramps In Periods Saam Tv
लाईफस्टाईल

Leg Cramps In Periods : मासिक पाळीत पायात क्रॅम्प्स येतात? हे उपाय करुन पाहाच

Periods Problem : मासिक पाळीत पायात क्रॅम्प्स येतात. अशावेळी काय करावे? काळजी कशी घ्यावी? जाणून घेऊया.

कोमल दामुद्रे

How To Get Rid Leg Cramps :

वाढत्या वयानुसार शरीरातील हार्मोन्स बदल्यानंतर मुलींन मासिक पाळी येते. स्त्रियांच्या मासिक पाळीचा कालावधी हा दर २८ ते ३० दिवसांचा असतो. हे कालचक्र चुकले तर त्यांना अधिक टेन्शन येते.

मासिक पाळीच्या दरम्यान पाय दुखणे, पाठदुखी किंवा पोटदुखीच्या समस्या असते. अनेक वेळा त्यांना पेन किलरची मदत घ्यावी लागते. परंतु, पेन किलरचे अतिप्रमाणात सेवन केल्याने आरोग्यास त्रास होतो. मासिक पाळीत पायात क्रॅम्प्स येतात. अशावेळी काय करावे? काळजी कशी घ्यावी? जाणून घेऊया. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. क्रॅम्प्स का येतात?

पीरियड्स दरम्यान, आपल्याला शरीरात हार्मोन्स तयार होतो, ज्यामुळे गर्भाशयात आकुंचन होते. ज्यामुळे त्याचा थर कमी होण्यास मदत होते. त्यामुळे पोटात, कंबरेत, पाठीत किंवा पायांमध्ये तीव्र वेदना होतात. तसेच क्रॅम्प्सचे दुसरे कारण जीवनसत्त्व (Vitamins) ड ची कमतरता. याचा शारीरिक आणि मानसिक या दोन्हीवर परिणाम होतो.

2. वेदना कमी करण्यासाठी काय करावे?

  • मासिक पाळीच्या काळात हलका व्यायाम करावा. चालणे किंवा पोहणे यांसारख्या गोष्टींमुळे आराम मिळू शकतो. व्यायामामुळे रक्ताभिसरण सुधारते. ज्यामुळे क्रॅम्प्स टाळण्यास मदत होईल.

  • या काळात आल्याचा तुकडा चघळल्याने देखील आराम मिळतो. या दुखण्याला सतत सामोरे जावे लागत असेल तर अॅक्युपंक्चर हा चांगला उपाय आहे.

  • तसेच केळी (Banana) खाल्ल्याने आराम मिळतो. यामध्ये पोटॅशियम असते जे स्नायूंच्या वेदना कमी करण्यास मदत करते.

  • पायांना विश्रांती देण्यासाठी गुडघ्याखाली उशी ठेवा आणि पोटावर झोपा. यामुळे आराम मिळेल.

  • पायांना मसाज करा. ज्यामुळे रक्ताभिसरण होण्यास मदत होते. वेदनांमुळे आराम मिळेल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Govinda sunita divorce : गोविंदा फक्त माझा आहे, वरून देव आला तरी...; घटस्फोटांच्या चर्चांवर पत्नी सुनीताची प्रतिक्रिया

Maharashtra Live News Update: शिवसेनेचे उपनेते आमदार हेमंत पाटील यांच्या निवासस्थानी गणरायाची प्राणप्रतिष्ठापना.

Ganesh Chaturthi 2025 LIVE Updates : शिवसेनेचे उपनेते आमदार हेमंत पाटील यांच्या निवासस्थानी गणरायाची प्राणप्रतिष्ठापना

Manoj Jarange: पप्पा मुंबईला निघाले, मुलींना अश्रू अनावर, एकीला आली चक्कर; तरीही मनोज जरांगे पुढे निघाले; भावुक VIDEO व्हायरल

रिमझिम पाऊस, ढोल ताशांचा गजर! पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांसह घरोघरी बाप्पांचे जल्लोषात स्वागत

SCROLL FOR NEXT