Leftover Rice Saam TV
लाईफस्टाईल

Leftover Rice : थांबा थांबा! रात्रीचा उरलेला भात फेकू नका; बनवा 'या' टेस्टी रेसिपी

Leftover Rice new Recipe : तुमच्या घरी देखील रात्रीचा भात काहीवेळा शिल्लक राहत असेल. तर असा भात फेकून देऊ नका. त्याऐवजी या भातापासून काही मस्त आणि टेस्टी रेसिपी बनवा.

Ruchika Jadhav

रात्री घरामध्ये कोण किती जेवणार याचा काही अंदाज नसतो. अनेकदा मुलं मित्र परिवारासह बाहेर काही खातात आणि त्यांना भूक जास्त राहत नाही. त्यामुळे रात्रीचा भात हमखास शिल्लक राहतो. आता तुमच्या घरी देखील रात्रीचा भात काहीवेळा शिल्लक राहत असेल. तर असा भात फेकून देऊ नका. त्याऐवजी या भातापासून काही मस्त आणि टेस्टी रेसिपी बनवा.

फ्राईड राईस

चायनीज कॉर्नवर मिळणारा फ्राईड राईस प्रत्येकाचा फेवरेट असतो. आता तुम्हाला देखील फ्राईड राईस आवडत असेल तर तुमच्यासाठी ही रेसिपी खास आहे. फ्राईड राईस बनवण्यासाठी आधी तेलात जिरे, मोहरी, हळद, मीठ आणि तिखट टाकून घ्या. त्यानंतर मॅगी किंवा चींग्ज चायनीजचा मसाला यात मिक्स करा आणि भात यात परतून घ्या. तयार झाला फ्राईड राईस.

तवा पुलाव

तुम्ही उरलेल्या भाताचा तवा पुलाव सुद्धा बनवू शकता. त्यासाठी आवडीच्या भाज्या आणि पाव भाजी मसाल्याची आवश्यकता आहे. या टीप्सने तुम्ही घरीच टेस्टी तवा पुलाव बनवू शकता.

लेमन राईस

तुम्ही उरलेल्या भाताचा लेमन राईस सुद्धा बनवू शकता. त्यासाठी कढीपत्ता, चण्याची डाळ, काजू आणि मोहरी यांचा तडका द्या. त्यानंतर यावर लिंबाचा रस घ्या. नंतर भात यात परतून घा. तयार झाला लेमन राईस.

भाताचे पॅटीस

तुम्ही उरलेल्या भाताचे पॅटीस सुद्धा बनवू शकता. त्यासाठी भातामध्ये विविध भाज्या आणि मसाले मिक्स करून त्याचे पॅटीस बनवा आणि ते फ्राय करून घ्या. हे पॅटीस तुम्ही सॉस किंवा केचप बरोबर सुद्धा खाऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BEED: मॅरेथॉनसाठी हायवेवर धावण्याची प्रॅक्टिस, विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ; शिक्षकांची अजब उत्तरं; VIDEO व्हायरल

Video : लोकसभेत गदारोळात मला मारहाण केली, जोरात ढकललं; महिला खासदाराचे केंद्रीय मंत्र्यांवर गंभीर आरोप

LICची मोठी घोषणा! बंद पडलेली पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी, १७ सप्टेंबरपर्यंत मिळणार विशेष सवलती

Online Gaming Regulation Bill: ऑनलाइन गेमिंगचा सरकारकडून 'गेम'; दोन्ही सभागृहात ऑनलाइन गेमिंग विधेयक मंजूर

निवडणुकीत ठाकरेंचा पराभव, एकनाथ शिंदे म्हणाले... | VIDEO

SCROLL FOR NEXT