Leftover Chapati SAAM TV
लाईफस्टाईल

Leftover Chapati Recipe: उरलेल्या चपात्यांपासून बनवा तंदूरी पनीर रॅप, विसराल रेस्टॉरंटची चव..

Paneer Wrap Recipes With Leftover Chapati Recipes : उरलेली पोळीपासून झटपट बनवा रेस्टॉरंट स्टाईल हे पदार्थ. जाणून घ्या सोप्या रेसिपी..

Shreya Maskar

पावसात आपल्याला नेहमी चटपटीत खायला आवडते. पण नेहमी पावसात बाहेरचे खाणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे पावसात बाहेरचे अन्नपदार्थ खाणे टाळा आणि घरीच खमंग पदार्थ बनवा. रोज आपल्या घरी रात्री जेवताना चपाती उरते. ही चपाती महिलावर्ग दुपारच्या जेवणात खातात. पण याच उरलेल्या चपातीपासून तुम्ही नाश्त्याला स्वादिष्ट पदार्थ बनवू शकता. जे पदार्थ तुमची मुले ५ मिनिटात फस्त करतील. तर पावसात मुलांचे आरोग्य जपा आणि उरलेल्या चपातीपासून चटपटीत पदार्थ बनवा. या पदार्थांची सोपी रेसिपी जाणून घ्या..

रोटी बॉल

साहित्य

रोटी बॉल बनवण्यासाठी उरलेली चपाती, कांदा, शिमला मिरची, गाजर, तिखट-मीठ, काळी मिरी पावडर आणि आलं लसूण पेस्ट इत्यादी साहित्य लागते.

कृती

रोटी बॉल बनवण्यासाठी उरलेल्या चपातींचे बारीक तुकडे करून घ्या. त्यानंतर एका भांड्यामध्ये चपातीचे बारीक तुकडे, कांदा, शिमला मिरची, गाजर, तिखट-मीठ, काळी मिरी पावडर,आलं लसूण पेस्ट घालून सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्या. चपाती पाण्यामध्ये भिजवून त्यामध्ये हे सारण भरून घ्या. पॅनमध्ये तेल गरम करून रोटी बॉल्स सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. अशाप्रकारे तुमचे रोटी बॉल्स तयार झाले. सॉससोबत तुम्ही यांचा स्वाद घेऊ शकता.

चटपटीत पिझ्झा

साहित्य

घरगुती स्टाईलने पिझ्झा बनवण्यासाठी उरलेली चपाती, कांदा, शिमला मिरची, टोमॅटो, मक्याचे दाणे, ओरेगॅनो, चिली फ्लेक्स, चीज, पिझ्झा सॉस, तेल इत्यादी साहित्य लागते.

कृती

आता घरबसल्या घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांपासून तुम्ही पिझ्झा बनवू शकता. पिझ्झा बनवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला एका भांड्यात कांदा, शिमला मिरची, टोमॅटो तसेच तुम्हाला आवडणाऱ्या इतर भाज्या छान कापून घ्या. आता उरलेल्या चपतीला तेल लावून गरम करून घ्या. त्यानंतर या चपातीवर पिझ्झा सॉस सर्वत्र छान लावून घ्या. त्यावर चीज घालून कापलेल्या सर्व भाज्या छान पसरवून घ्या. यावर उकडलेले मक्याचे दाणे , ओरेगॅनो, चिली फ्लेक्स घाला. एका पॅनमध्ये तेल घालून चपातीचा पिझ्झा झाकून ठेवा. ५ ते १० मिनिटांनी तुमचा पिझ्झा तयार होईल. खाताना परत पिझ्झावर ओरेगॅनो, चिली फ्लेक्स टाका. चटपटीत घरगुती पिझ्झा तयार झाला.

तंदूरी पनीर रॅप

साहित्य

तंदूरी पनीर रॅप घरी बनवण्यासाठी उरलेली चपाती, पनीर, दही, तिखट-मीठ, पुदीना, मेयोनीज, चीज, कांदा, काकडी, कोथिंबीर, कोबी, तूप, जिरेपूड आणि हळद इत्यादी साहित्य लागते.

कृती

तंदूरी पनीर रॅप बनवण्यासाठी सर्वप्रथम पनीर दही, तिखट-मीठ, जिरेपूड, हळद टाकून मॅरिनेट करून घ्या. त्यानंतर पॅनमध्ये तूप टाकून पनीर फ्राय करून घ्या. दुसरीकडे एका भांड्यात काकडी, कांदा, कापून घ्या. आता उरलेल्या चतपातीचे चतकोर भाग करून एका भागाला मेयोनीज लावा तर दुसऱ्या भागावर चीज पसरवा. तिसऱ्या भागावर पनीर फ्रायचे तुकडे ठेवा आणि शेवटच्या भागावर कापलेल्या भाज्यांचे तुकडे ठेवून त्यावर कोबी, पुदीना आणि कोथिंबीरची पानं ठेवून चपाती चारीबाजूने छान दुमडून घ्या. आता पॅनमध्ये तेल गरम करून ही पोळी मंद आचेवर खुसखुशीत होईपर्यंत फ्राय करून घ्या. चीज डिपसोबत तुम्ही या झणझणीत तंदूरी पनीर रॅपचा आस्वाद घेऊ शकता.

टीप : ही फक्त सामान्य माहिती आहे. साम टिव्ही या माहितीचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT