बाहेरून फळं, भाज्या घरी आणल्यावर त्या खाण्याआधी पाण्याने स्वच्छ धुवून घेणं गरजेचं असतं. यावर असलेली माती, अथवा किटकनाशक पावडर पोटात गेल्यास व्यक्ती आजारी पडतात. सध्या सोशल मीडियावर फळभाज्या धुतानाचा एक संतापजनक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये काही व्यक्तींनी आपल्या पायांनी गाजर धुतले आहेत.
वजन कमी व्हाव, दृष्टी अधिक स्पष्ट व्हावी यासाठी अनेक व्यक्ती गाजर खातात. यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटिन असते त्यामुळे डॉक्टर देखील गाजर खाण्याचा सल्ला देतात. गाजर असो अथवा अन्य फळे आणि फळभाज्या सर्व काही जमिनीत पेरले जाते आणि तेथूनच मोठे होते. त्यामुळे सर्व भाज्यांना माती लागलेली असते. काही कंदमुळे असल्यास त्यावर तर सर्वात जास्त माती चिकटल्याचे दिसते.
आता गाजर विकणाऱ्या या व्यक्तींनी देखील शेतातून गाजर आणले असणार. या गाजरवर माती असल्याने ते धुवून स्वच्छ करायचे होते. त्यामुळे येथील नऊ ते दहा व्यक्ती एकत्र येतात एका मोठ्या टोपल्यात सर्व गाजर टाकतात. त्यानंतर नदीमध्ये सर्वजण एकत्र येत पाण्यामध्ये गाजर धुवून घेतात.
संतापजनक बाब म्हणजे या व्यक्तींनी पायाने हे गाजर स्वच्छ केलेत. तसेच ज्या पाण्यामध्ये गाजर धुवत आहेत ते पाणी देखील अस्वच्छ आहे. अस्वच्छ पद्धतीने गाजर धुवून झाल्यानंतर त्यांनी ते थेट रस्त्यावर विकण्यासाठी ठेवलं आहे. सदर घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर @foodie_saurabh_ या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ नेटकरी देखील संताप व्यक्त करत आहेत. कोणतेही फळ खाताना आधी ते स्वच्छ धुवून घ्या. भाज्या किंवा फळे बाहेरून आणल्यावर घरी स्वच्छ पाणी आणि शक्य असल्यास कोमट पाण्यात धुवून घ्या अशाही सुचना काही व्यक्तींनी दिल्या आहेत.
सोशल मीडियावर या आधी देखील अस्वच्छ पाण्याने भाज्या धुण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. एका रेल्वे स्थानकात भाजी विक्रेती महिला प्लॅटफॉर्मवर पाईमधून येणाऱ्या पाण्यात भाज्या धुवत होती. या घटनेवरही नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.