कोनासन Saam Tv
लाईफस्टाईल

कोनासन करण्याचे फायदे जाणून घ्या

पाठदुखीचा किंवा पाठीच्या कण्याचा त्रास असलेल्यांनी 'कोनासन' केल्यास त्याचे निश्चितच फायदे जाणवू लागतील.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कोनासनामुळे होईल पाठदुखीची समस्या दूर

पाठदुखीचा किंवा पाठीच्या कण्याचा त्रास असलेल्यांनी 'कोनासन' केल्यास त्याचे निश्चितच फायदे जाणवू लागतील. या आसनामुळे संपूर्ण शरीराला चांगला ताण मिळेल. त्याचसोबत पाठीच्या कण्याची लवचिकताही वाढते. हे आसन कसे करावे आणि त्याचे इतर फायदे कोणते ते जाणून घेऊयात..

कोनासन कसे करावे?

जमिनीवर किंवा योग मॅटवर विश्राम स्थितीत उभे राहावे. दोन्ही पायांमध्ये थोडे अधिक अंतर ठेवा. आता उजवा हात वर उचला. त्यानंतर हळूहळू डाव्या पायाच्या जवळ खाली वाका. आता डाव्या हाताने डावा पाय पकडून उजव्या हात आणि त्याचा तळवा ताठ ठेवा. हे आसन करताना मान वर करून उजव्या हाताकडे पहा. थोडा वेळ याच स्थितीत थांबल्यानंतर हिच कृती डाव्या हाताने करा.

कोनासन करण्याचे फायदे कोणते?

- शरीराला चांगला ताण मिळतो. या आसनामुळे पायांना आणि ओटीपोटाच्या आतील आणि बाहेरील स्नायूंना योग्य प्रमाणात ताण मिळतो.

- ओटीपोटातील विविध अवयवांचे कार्य सुधारते.

- कमरेजवळील अतिरिक्त चरबी कमी होते.

- पाठीच्या कण्याची लवचिकता वाढते.

- शरीराची स्थिरता वाढवण्यास मदत मिळते.

- पोटाच्या स्नायूंचे कार्य सुधारते, त्यामुळे शरीराचे संतुलन आणि स्थिरता सुधारते.

- पाठ आणि पाठीच्या कण्याचा कडकपणा कमी करते आणि त्यांची लवचिकता वाढवते.

- कमरेखालील भाग आणि खांदे मोकळे होतात.

- तणाव कमी करण्यात मदत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Symbol Dispute: शिवसेना पक्षफुटीला 1999च्या पक्ष घटनेचा आधार; सुप्रीम कोर्टात शिंदेसेनेचा जोरदार युक्तीवाद

Thursday Horoscope : आज या राशींना मिळणार मोठी संधी! तुमची रास यात आहे का? वाचा एका क्लिकवर

शैक्षणिक कर्जाची मर्यादा ५ वरून २० लाख करा; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची मागणी, सुनेत्रा पवारांची घेतली भेट

PM Modi Photo Removal Case: मनसेच्या नेत्याला मुंबईतून अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

Nepal Flood: महापुरात घरं वाहून नेली, पण निष्ठा नाही! मालकाच्या प्रतीक्षेत कुत्रे ढिगाऱ्याजवळ ठाण मांडून

SCROLL FOR NEXT