School bulling, Parenting tips, Child care ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

स्कूल बुलिंगचा मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर कसा परिणाम होतो, जाणून घ्या

स्कूल बुलिंग म्हणजे काय ?

कोमल दामुद्रे

मुंबई : शाळा सुरु झाल्यानंतर मुलांचा बहुतेक वेळ हा त्याचा शाळेत किंवा क्लासमध्ये जात असतो. शाळेच्या अभ्यासाव्यतिरिक्त मुलांना इतर गोष्टी देखील शिकायला मिळतात.

हे देखील पहा -

मुले शाळेत गेल्यानंतर त्यांच्या मित्रांकडून किंवा आजूबाजूला असणाऱ्या लोकांकडून ते चांगल्या व वाईट गोष्टी शिकत असतात. तसेच शाळेतील शिक्षणाबरोबर ते खूप सारे सोशल बिहेवियर शिकतात. अशावेळी कधी कधी मुले त्यांच्या मित्रांकडून केल्या जाणाऱ्या निगेटिव्ह बिहेवियरची शिकार होत असतात. ज्याचा त्यांच्या अभ्यासावर व वागण्यावर परिणाम होऊ लागतो. अशा वागण्याला स्कूल बुलिंग असे म्हटले जाते. स्कूल बुलिंगचे दोन प्रकार असतात. पहिले शारीरिक, तर दुसरे मानसिक त्याविषयी जाणून घेऊया.

१. एखाद्या मुलाने मारणे वा मारण्याची धमकी देणे, पेन वा हाताने चालू वर्गात टच करणे वा दुखापत करणे. मुलाच्या वस्तू क्लासमध्ये हिसकावणे, चालताना धक्का मारणे यांना शारीरिक बुलिंग असे म्हटले जाते.

२. एखाद्याला विचित्र नाव ठेवणे व सर्व मुलांसमोर चिडवणे, ग्रूप बनवून एखाद्या मुलाशी अबोला धरणे. त्या मुलाला (Child) वर्गात कोणीही मदत न करणे. मुले बसण्याच्या सीटवर निगेटिव्ह कमेंट लिहिणे.

३. स्कूल बुलिंगचा मुलांवर अत्यंत वाईट परिणाम होतो आणि त्याचे वागणे बदलू लागते. ज्यामुळे मुल शाळेत जाण्यास नकार देते, जेवणाकडे दुर्लक्ष करते, सतत चिडचिड करणे किंवा शांत राहाणे, अभ्यास न करणे यांसारखी लक्षणे मुलांमध्ये दिसू लागतात यासाठी पालकांनी मुलांकडे लक्ष द्यायला हवे.

४. मुलामध्ये अशी लक्षण दिसल्यास पालकांनी (Parents) मुलाला प्रेमाने विचारपूस करावी. त्याला शाळेत काही त्रास होत असले तर त्याची चौकशी जरुर त्याच्या शाळेतील शिक्षकांजवळ करावी. तो काही सांगत असेल तर ते लक्षपूर्वक ऐकावे, मुलांच्या शाळेत जाऊन त्याच्या शिक्षकांना भेटावे. त्याच्या बदलेल्या वागण्याविषयी विचारावे किंवा त्याला होणाऱ्या त्रासाबद्दल शिक्षकांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. वर्गातील त्याच्या वागण्याचा शोध घ्यावा. तसेच मुलाच्या शाळेतील मित्रांना भेटावे आणि त्यांच्यासोबत बोलावे या साऱ्या प्रयत्नांनंतरही मुलाच्या वागण्यात कोणताही फरक पडत नसेल, तर स्कूल काउंसलर वा मानसोपचार तज्ज्ञांना दाखवावे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLA car accident : बुलढाण्यात आमदाराच्या कारचा भीषण अपघात, २५ वर्षाचा तरूण कोमात

Navratri Rules: नवरात्रीत कांदा-लसूण का खाऊ नये? जाणून घ्या कारण

चिकन खाल्लं, बेसीन धुण्यावरून राडा; MPSC करणाऱ्या मुलींची हाणामारी, ४ जणींनी रूम पार्टनरला भींतीवर आदळून चोपलं

Maharashtra Live News Update: एसटी प्रवर्गातील आरक्षणासाठी धनगर समाज बांधवांचे बीडमध्ये आंदोलन

Momos Recipe: मैदा नाही तर गव्हापासून बनवा पौष्टिक मोमोज, सोपी रेसिपी वाचा

SCROLL FOR NEXT