Working women and housewife diet plan, Health tips  ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

गृहिणी किंवा वर्किंग वूमनचा आहार कसा असायला हवा, जाणून घ्या

वर्किंग वूमनने आहार कसा करायला हवा ?

कोमल दामुद्रे

मुंबई : बहुतेक महिला या घरी किंवा आपल्या जॉबमध्ये सतत व्यस्त असतात त्यामुळे त्याचे खाण्यापिण्याकडे अधिक लक्ष नसते. त्याच्या खाण्यापिण्यात कमी पौष्टिक घटक असल्यामुळे शरीराला आवश्यक ती पौष्टिक तत्व मिळू शकत नाही.

हे देखील पहा -

गृहिणी असो किंवा वर्किंग वूमन तिचा पहिला विचार हा तिच्या कुटुंबाच्या आरोग्याचा असतो. कुटुंबाचे आरोग्य जपण्याचा प्रयत्न करताना तिचे मात्र स्वत:कडे दुर्लक्ष होत जाते. ज्यामुळे त्यांच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कमी होत जाते व त्यांना अनेक आजारांचा सामना करावा लागतो. काही स्त्रिया वजन वाढू नये यासाठी कमी खातात त्यामुळे त्यांना पचनासंबंधित समस्याना सामोरे जावे लागते. यासाठी महिलांनी दिवसभराचा आहार कसा असायला हवा हे जाणून घेऊया.

१. सकाळच्या नाश्त्याची वेळ किंवा नाश्ता कधीही चुकवू नका. दिवसभरासाठी शरीराला हव्या असणाऱ्या ऊर्जेसाठी तो अत्यंत आवश्यक आहे. नाश्त्यात आपण दूध, कॉर्नफ्लेक्स, सॅण्डविच आदी घेऊ शकता. तसेच पर्याय म्हणून आपण फ्रूट चाटही खाऊ शकतो. शिवाय ग्लासभर दुधासोबत ड्रायफ्रूट्स घेणेही उत्तम पर्याय आहे.

२. लंचमध्ये डाळ, चपाती व सॅलडचा समावेश करा. यात आपण दही, ताक, ब्रोकोली, पालक यासारख्या पालेभाज्याही घेऊ शकतो. याशिवाय कमी तेलात (Oil) बनवलेली पनीर फ्राय लंचमध्ये घेऊ शकतो. सॅलडमध्ये सिमला मिरची, काकडी, किशमिश थोडेसे लिंबू पिळून घ्यावे. ज्यामुळे याची चव वाढेल.

३. संध्याकाळच्या वेळी भूक लागते त्यावेळी फळे आणि ओट्स आपण खाऊ शकतो ज्यामुळे आपली भूक क्षमवू शकतो.

४. डिनर नेहमीच झोपण्याच्या दोन तास आधी घ्यावे ज्यामुळे तो पचू शकेल. जेवणात रात्रीच्या वेळी तेलकट तिखट (Spices) पदार्थ नसावे यासाठी जेवणात चपाती व कमी मसाल्याची भाजी घ्या यामुळे ऊर्जा मिळण्यासोबतच पचनहीं उत्तम होईल. तसेच जेवल्यानंतर २० मिनिटे अवश्य चालावे. याप्रकारे आपण आपल्या आहार ठेवाला तर वजन वाढणार नाही व प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: मविआला देशापेक्षा आघाडी महत्वाची; अखेरच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा घेतला समाचार

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

SCROLL FOR NEXT