Mouthwash Side Effects Fact Check Saam tv
लाईफस्टाईल

Mouthwash Side Effects Fact Check : माऊथवॉशमुळे कॅन्सरचा धोका? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Mouthwash Side Effects : तुम्ही माऊथ वॉश वापरत असाल तर सावध व्हा... कारण माऊथ वॉश वापरणं जीवावर बेतू शकतं. माऊथ वॉशमुळे गंभीर आजार होऊ शकतो असा दावा करण्यात आलाय... माऊथ वॉश अनेक जण वापरत असल्यामुळे आम्ही या मेसेजची पडताळणी केली... मग काय सत्य समोर आलं तुम्हीच पाहा...

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : फ्रेश राहण्यासाठी तुम्ही जर माऊथ वॉश वापरत असाल तर वेळीच सावध व्हा... दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या फंदात पडू नका... कारण माऊथ वॉश वापरल्याने कॅन्सर होतो असा दावा करण्यात आलाय... अनेकजण तोंडाची स्वच्छता करण्यासाठी माऊथ वॉशचा वापर करतात.. त्यामुळे आम्ही या मेसेजची पडताळणी सुरू केली.. मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

माऊथवॉशने कॅन्सरचा धोका अनेक पटींनी वाढतो. अभ्यासात असे आढळून आले की, जर एखाद्याने 3 महिने सतत दिवसातून तीन वेळा तोंड धुतले तर तोंडात दोन बॅक्टेरिया - 'फ्यूसोबॅक्टेरियम न्यूक्लिएटम' आणि 'स्ट्रेप्टोकोकस अँजिनोसस' वाढतात. हे दोन्ही घटक कॅन्सर निर्माण करणारे आहेत.

हा दावा धक्कादायक आहे. आपल्या आरोग्याचा प्रश्न असल्याने आमच्या व्हायरल सत्य टीमने याची पडताळणी सुरू केली. याची माहिती डॉक्टर देऊ शकतात. त्यामुळे डॉक्टरांकडून याचं सत्य जाणून घेतलं...

काय आहे व्हायरल सत्य?

हा दावा 'जर्नल ऑफ मेडिकल मायक्रोबायोलॉजी' मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधन लेखात करण्यात आला आहे.

माऊथवॉश अल्कोहोलच्या मदतीने बनवले जातात

माऊथवॉशमध्ये कृत्रिम घटक असू शकतात ज्यांच्यामुळे कॅन्सरचा धोका असतो

नियमितपणे माऊथवॉश वापरतात त्यांना डोके आणि मानेच्या कॅन्सरचा धोका जास्त आहे.

माउथ वॉशमध्ये 'क्लोरहेक्साइडिन' नावाचा घटक असल्याने दातांवर डाग तयार होतात.

श्वासातून येणारी दुर्गंधी घालवण्यासाठी आणि तोंड स्वच्छ धुण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत... दिवसातून दोनदा ब्रश करणे... तोंड स्वच्छ धुणे असेही पर्याय आहेत...मात्र, डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय माऊथवॉश सारखे उपाय करू नका...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या विठाबाई नारायणगावकर तमाशा मंडळातील कलाकरांना मारहाण

Farmer Loan waiver : महाराष्ट्रातील ७० हजार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ५०० कोटी रुपये मिळणार

एकनाथ शिंदे यांची ताकद आणखी वाढणार; २ पॉवरफुल नेत्यांची शिवसेनेत एन्ट्री होणार, राजकीय समीकरण बदलणार

Kundali Matching Tips For Marriage: लग्नासाठी मुला- मुलीचे किती गुण जुळले पाहिजेत?

Ashok Kharat Case: नगरसेवक होऊ शकत नाही, बुवाबाजी करून आमदार, मंत्री व्हायचंय; भाजपच्या महिला नेत्याचा रोख कुणाकडे?

SCROLL FOR NEXT