मनाली सागवेकर, साम डिजिटल
What is the meaning of numbers on railway electric poles? : तुम्ही ट्रेनमधून प्रवास करताय का? करत असाल तर कधी न कधी तुम्ही ट्रेनच्या खिडकीतून रुळांलगत असलेले लोखंडी खांब पाहिलेच असतील. हे खांब कशासाठी असतात? याचा विचार कधी केलाय का? बरं या खांबांवर पिवळ्या किंवा गडद निळ्या रंगात आकडे असतात. ते कधी नजरेस पडलेत का? जरी ते आकडे बघितले असतील तरी ते नेमके कशासाठी असतात? या आकड्यांवरून काय दर्शवलं जातं? याची माहिती तुम्हाला आहे का? हेच समजून घेण्याचा प्रयत्न करूयात.
रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असणारे हे खांब विजेवर चालणाऱ्या ट्रेन्ससाठी विद्युत ऊर्जा पुरवणारी कॅटिनरी वायर, कॉन्टॅक्ट वायर आणि इतर इलेक्ट्रिक ओव्हरहेड (OHE) उपकरणांना आधार देण्यासाठी उभारले जातात. या खांबांना एल मास्ट असे म्हणतात. खांब आणि त्यावरील आकडे एका ठराविक स्टेशन किंवा हेडक्वार्टरपासून किती कि.मी अंतरावर आहे? हे समजते. या आकड्यांमधील मोठी संख्या किलोमीटरचे अंतर दर्शवते तर, लहान आकारातील आकडे हे तो खांब त्या किलोमीटरमधील कितवा खांब आहे? हे दर्शवते. उदा: जर खांबावर ४९/१४ लिहिले असेल म्हणजे तो खांब ४९ किलोमीटरवरील १४ वा खांब आहे.
या आकड्यांचा वापर स्टेशन मास्तर एक युनिक आयडेंटिफिकेशन नंबर म्हणून करतात. जो लोको पायलट, ट्रॅक मेंटेनन्स टीम, आणि इतर रेल्वे कर्मचाऱ्यांना लोकेशन ओळखण्यासाठी मदत करतो. जेणेकरून कोणताही अपघात झाल्यास त्या ठिकाणचे मुख्य लोकेशन शोधता येईल आणि तात्काळ मदत पोहोचेल. हे आकडे भारतीय रेल्वेचे (OHE) विभाग (Electric Traction/Engineering) देतात आणि मेंटेन करतात. त्याचा उपयोग देखभाल, वायर बदल, अपघात नियंत्रण, आणि इंस्पेक्शनसाठी होतो.
या आकड्यांमुळे अपघात घडल्यानंतर मदत पोहोचवणं अधिक सोपं होतं. लोको पायलट आणि देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीही हे आकडे दिशादर्शक ठरतात. त्यामुळे रेल्वेच्या कार्यप्रणालीतील हा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. पुढच्या वेळी ट्रेनमधून प्रवास करताना हे आकडे पाहायला विसरू नका.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.