Difference between corn flour and corn starch, Kitchen tips  ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

मक्याचे पीठ आणि त्याच्या स्टार्चमधील फरक माहित आहे का?

कॉर्न फ्लोर व कॉर्न स्टार्च मधील फरक जाणून घ्या.

कोमल दामुद्रे

मुंबई : मका हा शरीरासाठी अधिक फायदेशीर मानला जातो. बरेच जण त्यासाठी गव्हाच्या चपाती ऐवजी मक्याची व बाजरीची चपाती खातात. मक्यापासून स्वयंपाकघरात वेगवेगळे पदार्थ बनवले जातात.

हे देखील पहा -

बहुतेक महिलांना मक्याचे पीठ वापरताना मक्याचे स्टार्च, कॉर्न मील पीठ यातील नेमका फरक माहित नसतो. ते कसे वापरायचे हे देखील त्यांना माहित नसते. त्यातील काही स्त्रियांना हे सारखेच वाटते त्यामुळे कोणताही पदार्थ बनवताना तो चुकतो. पण आपण कॉर्न फ्लोअर, कॉर्न मील फ्लोअर आणि कॉर्न स्टार्च बद्दल जाणून घेऊया.

कॉर्न फ्लोर -

मक्याच्या कणसात लोह अधिक प्रमाणात आढळून येते. याचे सेवन केल्याने शरीरातील लोहाची कमतरता पूर्ण होऊन हाडे मजबूत होण्यास मदत होते. यामुळे शरीरातील इम्यूनिटी देखील बूस्ट करता येतो. काही लोक कॉर्न फ्लोरलाच कॉर्न स्टार्च समजतात. हे बनवताना मक्याला सुकवून त्याचा पावडर बनवला जातो. या पावडरचा रंग पिवळसर असतो आणि हे पीठ थोडे जाडसर असते.

कॉर्न स्टार्च -

कॉर्नस्टार्च कॉर्नच्या पांढऱ्या पिष्टमय एंडोस्पर्मपासून बनवले जाते. त्यात कॉर्न स्टार्चचे प्रमाण जास्त असते आणि कॉर्नच्या पांढऱ्या भागातील प्रथिने आणि फायबर काढून टाकून बनवले जाते, फक्त एंडोस्पर्म नावाचा स्टार्च शिल्लक राहतो. त्याचा रंग पांढरा असून बारीक पावडरसारख हे असते.

कॉर्न फ्लोर व कॉर्न स्टार्च मधील नेमका फरक काय ?

या दोघांमध्ये बरेच अंतर आहे. या दोघांच्या प्रक्रियेपासून त्यांचा रंगातही बराचसा फरक आहे. कॉर्न फ्लोअर आणि कॉर्न स्टार्च दोन्ही कॉर्नपासून बनवले जातात. परंतु त्यांचे पोषक तत्व, चव आणि वापरांमध्ये भिन्नता आहेत.

त्याचा वापर कसा केला जातो -

भारतीय (India) खाद्यपदार्थांमध्ये कॉर्नला विशेष महत्त्व आहे. मक्याला उकळवून किंवा भाजून खाल्ले जाते. भाजीपासून (Vegetable) भजीपर्यंत याचा वापर केला जातो. कॉर्नफ्लोर किंवा कॉर्नस्टार्च अन्नपदार्थातील वेगवेगळ्या घटकांमध्ये वापरले जाते.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

Bhandara : अन् अचानक आकाशातून पडले दगडाचे तुकडे, भंडार्‍यात उल्का वर्षाव झाल्याचा संशय, नेमकं सत्य काय?

Homemade Toner : तुम्हाला त्वचेचा ग्लो वाढवायचा आहे? मग हे ५ स्वस्तात मस्त टोनर घरीच बनवा

Prasar Bharti Jobs: प्रसार भारतीमध्ये नोकरीची संधी; मिळणार भरघोस पगार; अर्ज कसा करावा?

Bigg Boss Winner : बिग बॉसच्या विजेत्यानं दिली प्रेमाची कबुली, 'सौंदर्या'सोबतचा रोमँटिक PHOTOS शेअर

SCROLL FOR NEXT