घराच्या स्वच्छतेसोबत घरातील वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचे आहे. आपल्या घरात पलंगावर अंथरली बेडशीट वेळेत बदली जाणे गरजेचे आहे. कारण आपण घरात असताना संपूर्ण दिवस त्यावर वावरत असतो. तसेच बाहेरून आल्यावर आपण त्यावर झोपतो. या सर्वांमुळे बेडशीटवर धूळ, माती, तेल, घाण जमा होऊन बेडशीट लवकर खराब होते. ज्यामुळे शरीराला संसर्ग होण्याचे प्रमाण वाढते. बेडशीटवरील वाढत्या बॅक्टेरियामुळे त्वचेच्या समस्या उद्भवतात. बरेच लोक महिन्यातून एक वेळा बेडशीट बदलतात जे की आरोग्यासाठी चुकूचे आहे. चांगल्या आरोग्यासाठी बेडशीट कधी बदलावी जाणून घेऊयात.
बेडशीट कधी बदलावी?
बेडशीटचा नियमित वापर होत असल्यामुळे आठवड्यातून एकदा बेडशीट बदलणे गरजेचे आहे.
तुमच्या घरी पाळीव प्राणी तसेच आजारी माणूस असेल तर दोन दिवसांतून एकदा बेडशीट बदलावी.
बेडशीट धुवण्याची योग्य पद्धत
बेडशीट कधीही इतर कपड्यांसोबत धुवू नये. कारण ती नीट धुणे गरजेचे आहे.
बेडशीट धुवण्या अगोदर कोमट पाण्यात सौम्य डिटर्जंट टाकून भिजवून ठेवा.
पावसात बेडशीट सुकवण्यासाठी वॉशिंग मशीनचा वापर करा.
बेडशीट खरेदी करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा
बेडशीट खरेदी करताना कपड्याचा क्वालिटी उत्तम असणे महत्वाचे आहे.
बेडशीट ची क्वालिटी ही सुताच्या दर्जावर अवलंबून असते.
बेडशीट आपल्या खोलीचा लूक बदलते. त्यामुळे रुमच्या लूकनुसार बेडशीटची पॅटर्न निवडावी.
पावसात बेडशीट खरेदी करताना रंगीबेरंगी रंग निवडावे. असे बेडशीट रुमची शोभा वाढवतात. यामुळे पावसाळ्यात खोलीचा लूक सुंदर येतो.
त्वचा आणि केसांचा बेडशीट बरोबर डायरेक्ट संपर्क येत असल्यामुळे बेडशीटच्या कापडाचा दर्जा नेहमी चांगला असावा.
डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.