Weight Loss Tips Saam TV
लाईफस्टाईल

Weight Loss: वजन कमी करायचं का? तर कॉफीमध्ये तूप घालून प्या आणि फरक पाहा

Weight Loss Tips: आरोग्य आणि फिटनेस प्रेमींमध्ये सध्या कॉफीमध्ये तूप घालून पिण्याचा नवा ट्रेंड सध्या चर्चेत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आरोग्य आणि फिटनेस प्रेमींमध्ये सध्या कॉफीमध्ये तूप घालून पिण्याचा नवा ट्रेंड सध्या चर्चेत आहे. यालाच 'बुलेटप्रूफ कॉफी' म्हणतात. हा कॉफीचा ट्रेंड खूपचं लोकप्रिय आहे. ही कॉफी वजन कमी करण्यासाठी आणि शरीरातील ऊर्जा पातळी वाढवण्यासाठी पिली जाते.  कॉफीमध्ये तूप मिसळण्याचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊया.

कॉफीमध्ये तूप मिसळून पिण्याचे काय फायदे आहेत?

१. तुम्ही कॉफीसोबत तूप प्यायल्याने शरीरात दीर्घकाळ ऊर्जा निर्माण होते असते. त्यामुळे दिवसभर उत्साही वाटते. तुपामध्ये असलेले चयापचय वाढवतात आणि तुमचा वजन कमी करण्याचा प्रवास सुलभ करतात.  यामुळे तुम्हाला जास्त काळ पोट भरल्यासारखे वाटते त्यामुळे जास्त खाणे आणि स्नॅक्स टाळू शकते.

२.कॉफीसोबत तूप घेतल्याने पचनक्रिया सुधारते.  कारण तुपामध्ये ब्युटीरिक ऍसिड असल्यामुळे ते आतडे निरोगी ठेवते. त्यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून मुक्त होण्यास मदत मिळते. याचं वेळी तूप शरीरातील हार्मोन्सचे

संतुलित राखण्याचे काम करते.

३. याशिवाय कॉफीसोबत तुपाचे सेवन केल्याने तुमची त्वचा सुधारण्यास मदत होते. तुपातमध्ये व्हिटॅमिन ए, ई आणि के असतात. त्यामुळे हे केस आणि त्वचेसाठी फायदेशीर असतात. यामुळे त्वचेची चमक कायम राहते. 

तूप घालून कॉफी कशी बनवायची

सर्व प्रथम एक कप कॉफी तयार करा.  त्यात १ ते २ चमचे तूप घाला, नंतर ब्लेंडर वापरून कॉफी आणि तूप पूर्णपणे मिसळा.  कॉफीची चव वाढवण्यासाठी त्यात थोडे मध घालू शकता. तुम्ही दालचिनीची पावडरही टाकू शकता. 

कॉफीसोबत तूप खाण्याचे काय फायदे आहेत?

तुपात कॅलरीज जास्त असल्यामुळे तूपचे सेवन मर्यादित प्रमाणातच करावे. तुम्ही केटोजेनिक आहार किंवा लो-कार्ब आहाराचे पालन करत असाल तर त्यांच्यासाठी हे विशेषतः फायदेशीर आहे. जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर बुलेटप्रूफ कॉफी प्यायल्याने तुमच्या कॅलरी मर्यादेत राहतील.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Edited by - अर्चना चव्हाण

Maharashtra Live News Update: निलंगा उपजिल्हाअधिकारी कार्यालयासमोर महादेव कोळी आदिवासी समाज बांधवांचा ठिय्या

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT