Realme 10 Smartphone Launch  Saam Tv
लाईफस्टाईल

Realme 10 Launched : 17 हजारांच्या आत 50 - मेगापिक्सल ड्युअल कॅमेरासोबत, Realme 10 चे 2 नवे स्मार्टफोन लॉन्च !

रियलमी नेहमीच कमी किंमतीत चांगले फिचर्स देण्याचा प्रयत्न करत असते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Realme 10 Launched : रियलमी चे स्मार्टफोन्स अगदी बजेट मध्ये मिळतात. रियलमी नेहमीच कमी किंमतीत चांगले फिचर्स देण्याचा प्रयत्न करत असते. लोकांन मध्ये सोशल मीडियाचा वापर वाढलेला आहे. इंस्टाग्राम (Instagram), फेसबुक, व्हॉट्सअपवर फोटोज पोस्ट करणायचा क्रेझ आहे.

त्यामुळे लोक नेहमी चांगला कॅमेरा (Camera) असेल अश्या फोनच्या शोधत असतात बऱ्याच वेळा लोक फक्त फोनच्या कॅमेराची क्वालिटी बघुनच फोन विकत घेतात त्यांच्यासाठी realme चा हा फोन (Phone) उत्तम पर्याय आहे.

Realme ने लॉन्च केलेल्या नवीन स्मार्टफोन Realme 10 चा 50-मेगापिक्सेलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असलेला 4G फोन आहे. या फोनची सुरुवातीची किंमत 13,999 रुपये आहे. त्याची विक्री 15 जानेवारीपासून सुरू होणार आहे.

हा फोन दोन प्रकारे लॉन्च करण्यात आला आहे -

हा फोन दोन प्रकारे लॉन्च करण्यात आलेला असून पहिला प्रकार ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजसह येतो. त्याची किंमत 13,999 रुपये आहे. तर, दुसरा प्रकार 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेजसह येतो. त्याची किंमत 16,999 रुपये आहे.

फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा -

फोनमध्ये डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचा पहिला सेन्सर 50 मेगापिक्सेलचा आहे. दुसरा 2 मेगापिक्सेलचा मोनोक्रोम सेन्सर आहे. यासोबतच 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही देण्यात आला आहे.

6.4 इंच फुल एचडी स्क्रीन -

फोनमध्ये 6.4-इंचाचा फुल एचडी प्लस सुपर एमोलेड डिस्प्ले आहे. फोनमध्ये Gorilla Glass 5 चे प्रोटेक्शन देण्यात आले आहे. हा फोन MediaTek Helio G99 SoC सह सुसज्ज आहे.

5000 mAh बॅटरी -

फोनची बॅटरी 5000mAh आहे. हे 33W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. 28 मिनिटांच्या चार्जमध्ये 50% चार्ज होईल असा कंपनीचा दावा आहे. हा फोन क्लॅश व्हाईट आणि रश ब्लॅक कलरमध्ये खरेदी करता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Shocking : मुंबई हादरली ! १५ वर्षीय मुलीवर जन्मदात्या वडिलांकडून मुलीवर बलात्कार, आईचाही समावेश

Shravana 2025: श्रावणात शिवलिंग पूजा करताना 'या' ७ वस्तू टाळा, होऊ शकतो अपशकुन

Liver cirrhosis last stage: लिव्हर सिरोसिसच्या लास्ट स्टेजमध्ये शरीरात होतात 'हे' मोठे बदल; यकृत सडण्याची लक्षणं वेळीच ओळखा

HBD Ranveer Singh : रणवीर सिंहचं ५ सुपरहिट चित्रपट, पहिला सिनेमा कोणता?

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT