लाईफस्टाईल

Explainer : देशात अत्याचारांच्या घटनांमध्ये का होतेय वाढ? विकृत मानसिकतेमागची कारणं काय आहेत?

महिलांवरील बलात्कार आणि बालकांवरील लैंगिक शोषण यांच्या प्रमाणात मोठ्या संख्येने वाढ झाली आहे. दरम्यान या घटनामधील आरोपीच्या विकृत मानसिकतेची काय कारणं आहेत, हे आपण तज्ज्ञांकडून जाणून घेतले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सध्या देशभरात महिलांवरील अत्याचारांचं प्रमाण कित्येक पटीने वाढलेलं दिसून येतंय. महिलांवरील बलात्कार आणि बालकांवरील लैंगिक शोषण यांच्या प्रमाणात मोठ्या संख्येने वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी कोलकात्याच्या आरजी मेडिकल कॉलेज महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कारानंतर बदलापूरमधील दोन चार वर्षांच्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेवर देशभरातून संताप व्यक्त होत आहे.

कोलकाता, बदलापूर, कोल्हापूरनंतर आता रत्नागिरीमध्ये बलात्काराची धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलंय. परिचारिकेचं शिक्षण घेत असलेल्या एका तरूणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना सोमवारी २६ ऑगस्ट रोजी उघडकीस आली. शिवाय लातूरमध्येही एका ७० वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार करून तिचा जीव घेण्यात आला. दरम्यान या घटनामधील आरोपीच्या विकृत मानसिकतेची काय कारणं आहेत, हे आपण तज्ज्ञांकडून जाणून घेतले आहेत.

मुंबईतील मनोचिकित्सक सागर मुंदडा यांच्या म्हणण्यानुसार, अशा विकृत मानसिकतेमागे अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. यामधील एक म्हणजे लहानपणापासून मुलांना दिली जाणारी शिकवण. मूल लहान असताना घरातील स्त्री कशी वागणूक देतेय, यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. मुलांच्या डोक्यात देण्यात आलेली वागणूक तशीच राहते आणि त्याच प्रकारचं कृत्य ते करू लागतात. दुसरा मुद्दा म्हणजे, घरात असलेल्या पुरुषांच स्त्रियांसंबंधी असलेलं वागणं. जर घरात पतीची पत्नीची हुकुमशाही चालत असेल तर घरात पाहणाऱ्या मुलाचा यावर खोलवर परिणाम होऊ शकतो.

डॉ. सागर यांनी पुढे सांगितलं की, यामध्ये पॉनोग्राफीचा मुद्दा देखील उपस्थित होतो. पॉर्न पाहिल्यानंतर त्याचप्रमाणे अनुकरण करणं हे देखील या विकृत मानसिकतेचं एक कारण असू शकतं. यासाठी योग्य पद्धतीने सेक्स एज्युकेशन मिळणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचारांमागे चाईल्ड पॉनोग्राफी कारणीभूत ठरते. कुठे ना कुठे यामागे व्यसनामुळे देखील असा पद्धतीची चुकीची पावलं उचलली जाऊ शकतात. व्यसनाधिन व्यक्ती नेमकं काय कृत्य करते, याची त्याला समज नसते. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडण्याची भीती असते.

समाजाची जडणघडण महत्त्वाचा मुद्दा

मुंबईच्या वांद्रे परिसरातील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्रशांत चौधरी यांच्या सांगितलं की, अशा आरोपींच्या विकृत मानसिकतेमागे अनेक गोष्टी कारणीभूत असू शकतात. यामध्ये एक पहिला मुद्दा उपस्थित होतो तो म्हणजे समाजाच्या जडणघडणीचा. यामध्ये समाजाच्या जडणघडणीची एक प्रमुख भूमिका बजावते. यावेळी आपण कोणत्या भागात राहतो, काय करतो हे महत्त्वाचं असतं.

दुसरी गोष्ट म्हणजे, अशी मानसिकता आपल्याला दूर करायची असेल तर लहानपणापासूनच या गोष्टी आपल्या मनावर बिंबवल्या गेल्या पाहिजेत. आपण कसं वागलं पाहिजे, अशा गोष्टी केल्याने काय परिणाम होतात, हे पालकांनी लहानपणापासूनचं सांगितलं आहे, असंही डॉ. चौधरी म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, गणरायाला निरोप देताना चौघे नदीत बुडाले; दोघांचा मृत्यू

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

Anant Chaturdashi 2025 live updates : गणपती विसर्जन मिरवणुकीत मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांसोबत ठेका धरला

SCROLL FOR NEXT