Monsoon Tips For Eyeglasses
Monsoon Tips SAAM TV
लाईफस्टाईल

Monsoon Tips : पावसात चष्मा वापरताना अडचणी येतात? फॉलो करा 'या' टिप्स

Shreya Maskar
Use of glasses in rain

पावसात चष्म्याचा वापर

पाऊस आनंदासोबत अनेक समस्या देखील घेऊन येतो. ज्या लोकांना चष्मा असतो त्यांना पावसात चष्म्याची विशेष काळजी घ्यावी लागते. ही काळजी कशी घ्यावी जाणून घ्या.

Soft cotton

मऊ सुती कपड

पावसात चष्मा वापरताना नेहमी मऊ सुती कपडा सोबत ठेवा आणि त्याने चष्मा पुसा.

Wash glasses

चष्मा धुणे

पावसाच्या पाण्याने चष्मा कितीही ओला झाला तरी साध्या पाण्याने चष्मा धुणे गरजेचे आहे.

Glasses frame

चष्म्याची फ्रेम

पावसात आपले कपडे ओले राहतात त्यामुळे कधीही शर्ट, साडीचा पदर यांनी चष्मा कधीही पुसू नये. तसेच कपड्यांवर धूळही असते आणि ती धूळ चष्म्याच्या काचांवर लागते. परिणामी चष्म्याची फ्रेम लवकर खराब होते.

Glasses

पावसातील वातावरण

पावसात वातावरणातील गारव्यामुळे चष्मा चिकट होतो. अशावेळी चष्मा लिक्विड सोप किंवा चष्मा स्वच्छ करणाऱ्या लिक्विड ने धुवावा.

Eyeglasses

चष्म्याची काच

चष्मा पुसताना कधीही काच रगडू नये. त्यामुळे काचेवर ओरखडे पडू शकतात.

Fitting of glasses

चष्म्याची फिटिंग

पावसात चष्मा काढ-घाल करण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे चष्मा भुवयांच्या तुलनेत सरळ बसतोय का याची खात्री करून घ्यावी. तसे होत नसल्यास चष्माच्या दुकानात जाऊन चष्मा दुरुस्त करून घ्यावा.

Loose glasses

सैल चष्मा

पावसात सैल चष्मा घालणे टाळा. कारण पावसाच्या पाण्यामुळे आधीच चष्मा खाली पडत असतो. त्यात जर तो सैल असेल तर चष्मा खाली पडून तुटण्याची शक्यता वाढते.

Extra glasses

जास्तीचा चष्मा

पावसात चष्मा खराब होण्याचे किंवा हरवण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे जास्तीचा एक साधा चष्मा आपल्या सोबत कायम ठेवा.

Eyeglasses in monsoon

पावसात रेनकोटचा वापर

चष्मा असलेल्या लोकांनी पावसात छत्रीचा वापर शक्यतो टाळा आणि जास्तीत जास्त प्रमाणात रेनकोट घाला. यामुळे चष्मावर पाणी पडण्याची शक्यता कमी असते. तसेच रेनकोट असल्यामुळे तुम्ही सहज चष्मा पुसू शकता.

Eyeglasses Box

चष्म्याचा बॉक्स

जास्त पावसात जर तुम्ही चष्मा काढून ठेवणार असाल तर चष्म्याचा बॉक्स नेहमी तुमच्या सोबत ठेवा. यामुळे प्रवासात चष्मा सुरक्षित राहील.

Disclaimer

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. साम टिव्ही या माहितीचे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur News : विजेचा धक्का लागून दोघा सख्या भावांचा मृत्यू; कोल्हापुरात शेतात काम करताना दुर्घटना

Nanded Viral Video: तिकिटासाठी बसमध्ये फ्री स्टाईल फाइट; प्रवाशाची कंडक्टरला 'दे बत्ती'

Maharashtra Live News Updates: शेतात काम करताना विजेचा शॉक लागून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

Indian Twitter Koo : ट्विटरला टक्कर देणारे Koo होणार भारतातून गायब; नेमकं काय आहे कारण? विराट कोहलीसह ९००० व्हीआयपींची होती अकाऊंट

Mumbai Potholes News: मुंबईत आरे दुग्ध वसाहतीत खड्ड्यांचं साम्राज्य!

SCROLL FOR NEXT