Raksha Bandhan SAAM TV
लाईफस्टाईल

Raksha Bandhan 2024 : यंदा 'रक्षाबंधन' ला घरीच बनवा १० मिनिटांत राखी, लाडका भाऊ होईल खुश अन् पाडेल गिफ्ट्सचा पाऊस

Rakhi Making Ideas : रक्षाबंधन सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशात तुम्हाला जर तुमच्या भावाला स्पेशल फील करायचे असल्यास घरीच त्याच्यासाठी आपल्या हाताने सुरेख राखी बनवा. सोपी पद्धत जाणून घ्या.

Shreya Maskar

यंदा १९ ऑगस्ट ला रक्षाबंधन सर्वत्र साजरी करण्यात येणार आहे. विविध गिफ्ट्स, राखी आणि मिठाईने सर्वत्र बाजार पेठा सजलेल्या दिसत आहेत. बहीण भाऊ या सणाची प्रत्येक वर्षी आतुरतेने वाट पाहत असतात. या वर्षीची रक्षाबंधन खास बनवण्यासाठी प्रत्येक बहि‍णींनी आपल्या भावासाठी घरीच सुरेख राखी बनवा.

घरी राखी कशी बनवावी?

रक्षाबंधनला घरात सोप्या पद्धतीने राखी बनवण्यासाठी सर्वप्रथम एक सुताचा दोरा घ्या. त्यानंतर त्यात दोरा ओवून सुईच्या साहाय्याने रंगीबेरंगी किंवा तुमच्या आवडीनुसार त्यात मोती ओवून घ्या. यासाठी तुम्ही पांढऱ्या मोतींचा वापर करा. त्यात मोत्यांची एक डिझाइन बनवा आणि ती फॉलो करा. मध्यभागी राखीचा वर्तुळ सुंदर दिसण्यासाठी त्यात विशेषता सोनेरी मणी लावा आणि छान सजवा. तसेच तुम्ही एका कार्डबोर्डच्या साहाय्याने गोल वर्तुळ कापून त्यावर छान कलाकृती करू शकता. जर तुमचा लहान भाऊ असेल तर तुम्ही त्यावर कार्टूनचे चित्र काढू शकता आणि जर तुमचा भाऊ मोठा असेल तर त्यावर सुंदर छोटा मजकूर किंवा फोटो एडिटिंग करून त्याचा फोटो लावू शकता. अशा पद्धतीने बनवलेली राखी तुमच्या भावाला नक्कीच आवडेल.

राखी बनवताना वेगवेगळ्या आकाराचे आणि रंगाचे मणी वापरा त्यामुळे राखी अजून सुरेख बनेल. शेवटचे टोक आल्यावर आवडत्या मणी ओवून राखीचा दोरा लॉक करून घ्या. घरी राखी बनवताना कधीही दोन दोऱ्यांचा वापर करावा. यामुळ राखी मजबूत होते. अशाप्रकारे फक्त १० मिनिटांत राखी तयार झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangram Jagtap: हिंदूंच्या दुकानात 'लादेन आणि सद्दाम'चे फटाके कसे? अजित पवारांच्या आमदाराचा सवाल|VIDEO

Rohit Sharma Fitness: रोहित शर्माने कसं कमी केलं १० किलो वजन? तब्बल 252 तास हिटमॅनने घेतली इतकी मेहनत

Tharala Tar Mag: 'ज्योती ताईंच्या आठवणी जाग्या...'; पूर्णा आजीच्या एन्ट्रीवर जुई गडकरी झाली भावूक, म्हणाली- 'रोहिणी ताई सेटवर...'

Maharashtra Live News Update : महाराष्ट्राच्या यादीत ९६ लाख बोगस मतदार - संजय राऊत

करिना- ऐश्वर्याशी तुलना, बेदीच्या मुलीने मार्केट खाल्लं, फोटो झाले तुफान व्हायरल

SCROLL FOR NEXT