Parenting Tips SAAM TV
लाईफस्टाईल

Parenting Tips : तुमची मुलं सतत उलट उत्तरं देतात? न रागावता करा 'ही' युक्ती, काही दिवसात होतील समजूतदार

Control Child Anger Tips : लहान वयात पालकांनी मुलांना पुरेसा वेळ देणे महत्वाचे आहे. कारण याचा मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. तुमची मुलं सतत उलट उत्तरं देऊ लागतात आणि त्यांचा उद्धटपणा वाढतो.

Shreya Maskar

मुलांचे संगोपन करणे हे जबाबदारीचे काम आहे. कारण आजची लहान मुलं उद्याचे भविष्य आहेत. लहान वयात मुलांची मानसिकता जपणे हे पालकांचे कर्तव्य आहे. पालकांनी मुलांशी मैत्रीपूर्ण नातं निर्माण नाही केल तर मुलं उद्धट वागू लागतात. सतत उलट उत्तरं देतात. त्यामुळे लहान वयात मुलांना जास्तीत जास्त वेळ द्या आणि त्यांच्यावर चांगले संस्कार करा. मुलं सतत उलट उत्तरं देत असतील तर त्यांच्यासोबत मैत्रीपूर्ण नातं तयार करा.

मुलांना वेळ द्या

आजकालच्या धावपळीच्या जगात पालक मुलांना पुरेसा वेळ देत नाहीत. त्यामुळे मुलांचे मानसिक आरोग्यावर याचा परिणाम होतो. पालकांनी नियमित मुलांशी संवाद साधला पाहिजे. चांगले-वाईटाची जाणीव करून दिली पाहिजे. मुलांसोबत मैत्रीपूर्ण संबंध तयार केले पाहिजे. जेणेकरून तुमची मुलं तुम्हाला सर्व सांगतील आणि तुमचा आदर करतील.

पालकांची वर्तणूक

तुमची मुलं वारंवार तुम्हाला उलट उत्तरं देत असतील तर, यामागे तुम्ही सुद्धा तितकेच जबाबदार आहात. कारण तुमची मुलांसमोरची वागणूक याला करणीभूत आहे. त्यामुळे पालकांनी मुलांसमोर चांगला आदर्श ठेवावा. पालकांनी मुलांसमोर भांडणे टाळावे. मुलांसमोर कोणालाही उलट उत्तरे देऊ नये. उलट निखळ संवाद साधावा. कारण मुलं तुमचे अनुकरण करत असतात. तसेच पालकांनी मुलांशी बोलतानाही विचारपूर्वक आणि आदरपूर्वक बोले पाहिजे. पालक जर मुलांवर सतत रागवत किंवा मोठ्याने बोलत असतील.तर मुल सुद्धा कालांतराने तशीच वागू लागतात.

मुलांच्या सभोवतालचे वातावरण

मुलांच्या रागाला किंवा उलट उत्तरं देण्याला त्याच्या सभोवतालचे वातावरण देखील कारणीभूत असते. त्यामुळे मुलांच्या आजूबाजूचे वातावरण सकारात्मक ठेवा. पालकांनी आपल मुलं बाहेर कोणाच्या संगतीमध्ये आहे याकडे लक्ष दिले पाहिजे. मुलांना वाईट संगत लागली असल्यास त्वरित ती सोडवावी. तसेच लहान मुलांना फोन देऊ नये. कारण मुलं यावर असंख्य वेळ घालवतात आणि यातून गोष्टी शिकत राहतात. यामुळे त्याच्या व्यक्तिमत्त्वावर वाईट परिणाम होताना दिसतो.

आदर भावना

लहानपणापासूनच मुलांना मोठ्यांचा आदर आणि लहानांना समजून घेण्याची सवय लावा. कारण यामुळे त्याचे भविष्य सुधारेल. पहिल्यांदाच उलट उत्तरं दिल्यावर आपल्या मुलाला थांबवा आणि समजून सांगा. मुलांच्या वागण्यासाठीच्या मर्यादा त्यांना निश्चित करून द्या. मुलांनी कुठे,किती आणि कसे बोलावे, याची योग्य शिकवण मुलांना द्या. तसेच मुलं तुमच्या मताशी असहमत असली तरी त्यांना हे नीट समजून सांगा. तसेच त्यांचे मत काय आहे हे सुद्धा जाणून घ्या. त्यांच्या मतांना दुर्लक्ष करू नका. कारण पालकांनी मुलांना आदर दिला, तर मुल इतरांना आणि पालकांना आदर देतात. तसेच त्यांच्या नात्यात विश्वास निमार्ण होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे मातोश्रीवर घेणार उद्धव ठाकरेंची भेट, निमित्त वाढदिवसाचे, चर्चा युतीची?

'हे होणारच होतं' रेव्ह पार्टीत जावई पुरते अडकले, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

Driving Licence: आता घरबसल्या करा मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया

Heavy Rain : मुसळधार पाऊस; वारणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग, कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ

Kumbh Rashi : कुंभ राशीचा आजचा रविवार जाणार कसा? वाचा स्पेशल राशीभविष्य

SCROLL FOR NEXT