How many hours of sleep do children need as they grow older ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

बाळाच्या वाढीसाठी किती तासांची झोप गरजेची आहे, जाणून घ्या.

बाळासाठी झोप घेणे किती महत्त्वाचे आहे ?

कोमल दामुद्रे

मुंबई : निरोगी आयुष्यासाठी आपल्याला पुरेसे खाणे व आवश्यक तितकी झोप महत्त्वाची असते. झोपेला आपल्या जीवनात सगळ्यात मोठे पोषक तत्व मानले जाते.

हे देखील पहा -

आपल्याला प्रत्येकाने पुरेपुर झोप घेणे आवश्यक आहे. परंतु, लहान मुलांना झोपेची गरज अधिक असते. त्यांनी पुरेशी झोप घेतल्यावर त्याची दिवसभरात होणारी चिडचिड कमी होऊ शकते. मुलांची व्यवस्थित रित्या झोप न झाल्यास त्याच्या वाढीवर व आरोग्यावर (Health) नकारात्मक प्रभाव पडतो. ज्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. पुरेशी झोप घेतल्यानंतर त्यांना दिवसभरासाठी ऊर्जा प्राप्त होते व त्यांना अनेक नवनवीन गोष्टी शिकण्यास मदत देखील होते.

तज्ज्ञांच्यानुसार प्रत्येकाच्या झोपेची वेळ ही त्याच्या वयानुसार ठरवली जाते. ज्या मुलांचे वय १ वर्षापेक्षा कमी असेल तर त्यांनी दिवसाला किमान १२ ते १६ तासांची झोप घ्यायला हवी. या वयातील मुलांच्या वाढीसाठी ते आवश्यक असते. ज्या मुलांचे वय हे १ ते २ वर्ष असते त्यांना जवळपास ११ ते १४ तासांची झोप आवश्यक आहे. तसेच ३ ते ५ वर्षातील मुले सतत खेळत असतात त्यासाठी त्यांना निदान १० ते १३ तासांची झोप आवश्यक आहे.

६ ते १२ वर्षाच्या मुलांमध्ये मानसिक व शारीरिक कार्यात अधिक व्यस्त असतात. त्याच्यासाठी दिवसाला ९ ते १२ तासांची झोप घेणे आवश्यक आहे. मुलांच्या वाढत्या १३ ते १८ वर्षाच्या मुल किशोरावस्थेत असतात त्यांना ८ ते १० तासांची झोप आवश्यक असते. मुलांनी (Child) बरोबर वेळेत झोप घेतली तर त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम होणार नाही. तसेच त्यांची वाढ देखील होईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT