Gawar Benefits Saam TV
लाईफस्टाईल

Cluster Beans Benefits: गवारची भाजी खाताना नाक मुरडताय? फायदे ऐकताच लगेच खाल

Gawar Benefits: चांगल्या आरोग्यासाठी व्यक्तींनी आहारात हिरव्या पालेभाज्याचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र गवारीच्या भाजीचा आहारात समावेश करणे हेही चांगल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बदलत्या जीवनशैलीचा व्यक्तीच्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो. अशातच चांगल्या आरोग्यासाठी आहारात पौष्टिक पदार्थांसह हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. दररोजच्या जेवणात अनेक भाज्याचा समावेश असतो. त्यातील एक भाजी ही गवारीची असते. गवारीच्या भाजीचे नाव घेतले तरी अनेकांना आवडत नाही. गवारीच्या भाजी खाण्यास सांगितले तर अनेक कारणे देत असतात. मात्र गवारीच्या भाजीचे आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

गवारीच्या भाजी अनेक जीवनसत्वांनी भरलेली आहे शिवाय शरीरासाठी महत्त्वपूर्ण असलेले फायबरही या भाजीतून आपल्याला मिळते. चला तर जाणून घेऊयात गवारीच्या भाजीचे अनेक फायदे.

मधुमेह रुग्णांसाठी

मधुमेहाच्या रुग्णांसाठी गवारीची भाजी खाण्याचा सल्ला दिला जातो. गवारीची भाजी खाल्ल्याने साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी आहारात गवारीच्या भाजीचा समावेश करावा.

हाडांच्या मजबुतीसाठी

गवारीच्या भाजीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळून येते. कॅल्शियममुळे हाडं मजूबत होण्यास मदत होते. त्यामुळे लहान मुलांसोबत प्रत्येकाने त्यांच्या आहारात गवारीच्या भाजीचा समावेश करावा.

पचनास फायदेशीर

ज्या व्यक्तींना सातत्याने पचनासंबंधित समस्या जाणवत आहे, त्या व्यक्तींनी गवारीच्या भाजी खाण्याचा सल्ला अनेकजण देत असतो.

हृदयासाठी फायदेशीर

गवारीच्या भाजीत हृदयासाठी आरोग्यासाठी फायदेशीर असे गुणधर्म आढळून येतात. यात हायपोग्लायसेमिक आणि हायपोलिपिडेमिक हे गुणधर्म असतात. ज्या व्यक्तींना हृदयासंबधित समस्या आहे त्या व्यक्तीनी अवश्य गवारीच्या भाजीचा आहारात समावेश करावा.

मासिक पाळीदरम्यान

मासिक पाळीदरम्यान प्रत्येक महिलेपासून तरुणीला अनेक वेदनांना सामोरे जावे लागते. त्यामुळे या दिवसात जास्तीत जास्त गवारीच्या भाजीचा आहारात समावेश करावा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अहिल्यानगरातील महात्मा फुले चौकात भीषण अपघात

Uttar Pradesh Heartbreaking : शाळेचा पहिला दिवस, कारमधून उतरला अन् धाडकन जमिनीवर कोसळला; १२ वर्षाच्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Nilesh Sable: निलेश साबळेला 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमातून का हटवलं, जाणून घ्या कारण

Maharashtra Politics: बाहेर ये...तो राज साहेबांविषयी बोललाय; राज ठाकरेंबाबत अपशब्द वापरणाऱ्याला मनसेनं बदडलं|VIDEO

Badlapur Firing : बदलापूर हादरलं! दिवसाढवळ्या आमदाराच्या बंगल्यासमोर गोळीबार

SCROLL FOR NEXT