kl rahul special trick toss coin disappointment saam tv
लाईफस्टाईल

IND vs SA: आता तरी जिंकूदे! टॉस जिंकण्यासाठी केएल राहुलने वापरला खास टोटका, तरीही पदरी निराशाच; पाहा नाण्यासोबत कर्णधाराने काय केलं?

भारताचा स्टार क्रिकेटपटू आणि कर्णधार के.एल. राहुल याने आजच्या सामन्यात टॉस जिंकण्यासाठी एक खास युक्ती वापरली. नाणं उडवताना त्याने थोडा वेगळा अंदाज दाखवला मात्र तरीही भारताने टॉस गमावला.

Surabhi Jayashree Jagdish

भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील दुसरा वनडे सामना रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळवण्यात येतोय. या सामन्यात टीम इंडियाने सलग 20 वेळा टॉस गमावला आहे. या सिरीजमध्ये शुभमन गिलच्या अनुपस्थितीत केएल राहुल भारताचं नेतृत्व करतोय. दरम्यान टॉस जिंकण्यासाठी केएलने शक्य तितके प्रयत्न केले असल्याचं दिसून आलं.

टॉसपूर्वी केएल राहुलने काय केलं?

नाणं हातात असताना केएल राहुलने ते तोंडाकडे नेत प्रार्थना केली. भारत यावेळी तरी टॉस जिंकूदे अशी त्याची इच्छा होती. मात्र यावेळीही टीम इंडियाच्या कर्णधाराला अपयश आलं. त्याची ही युक्ती अजिबात कामी आली नाही आणि भारताने पुन्हा एकदा टॉस गमावला.

राहुलने टॉसनंतर सांगितलं की, खरं सांगायचं तर आज टॉसचं सर्वात मोठं दडपण होतं. कारण मी गेल्या बऱ्याच काळापासून टॉस जिंकलेला नाहीये. मी टॉस कसा जिंकायचा हे शिकतोय, पण त्याचा काही फायदा होताना दिसतंय नाहीये.

टॉसपूर्वी केएलचं हे कृत्य व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतंय. टॉस जिंकण्यासाठी राहुल खूप उत्सुक दिसत होता मात्र सगल दुसऱ्या वेळी त्याच्या पदरी निराशा पडलीये.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) ने सोशल मीडियावर टॉसचा व्हिडिओ शेअर केला. त्यात राहुल टॉसपूर्वी नाण्यासोबत प्रार्थना करताना दिसला. टीम इंडियाच्या कर्णधाराने वनडे फॉर्मेटमध्ये शेवटचा टॉस 2023 च्या वनडे वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध जिंकला होता.

दक्षिण आफ्रिकेच्या टीममध्ये महत्त्वाचे बदल

रांचीमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात पराभव पत्करल्यानंतर रायपूरमध्ये खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या वनडेसाठी दक्षिण आफ्रिकेने आपल्या संघात ३ मोठे बदल केले. यामध्ये कर्णधार टेम्बा बावुमा यांचं कमबॅक झालं आहे. बावुमा व्यतिरिक्त टीममध्ये केशव महाराज आणि लुंगी एनगिडी यांचा समावेश करण्यात आला.

टीम इंडियाची प्लेईंग ११

यशस्वी जायसवाल, रोहित शर्मा, विराट कोहली, रुतुराज गायकवाड, वॉशिंगटन सुंदर, केएल राहुल (कर्णधार/विकेटकीपर), रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा

दक्षिण आफ्रिकेची प्लेइंग XI

क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), एडेन मार्कराम, टेम्बा बावुमा (कर्णधार), मॅथ्यू ब्रीट्जके, टोनी डी झोरझी, डेवाल्ड ब्रेविस, मार्को यान्सेन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, नंद्रे बर्गर, लुंगी एनगिडी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tapovan Tree Cutting: 'आमच्या तपोवनाला हात लावू नये...'; नाशिक तपोवन वृक्षतोडीविरोधात मराठी कलाकारांचा संताप

Maharashtra Live News Update: Evm चीप कुठे बनवले जाते हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारा - प्रकाश आंबेडकर

Chia Seeds: थंडीत सब्जा खा; त्वचा, वजन आणि तब्येतीसाठी उपयोगी

Sanchar Saathi App: एका दिवसात ६ लाख लोकांनी डाउनलोड केला 'संचार सारथी'; अ‍ॅपची खासियत आहे तरी काय?

Kalyan : भाजपचा शिंदेसेनेला पुन्हा धक्का, कल्याणमधील शिलेदार फोडला

SCROLL FOR NEXT