Sakshi Sunil Jadhav
चिया सिड्सचा वापर तुम्ही अनेक आजार आणि समस्या दूर करण्यासाठी करू शकता. कारण त्यामध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड्, झिंक, प्रथिने आणि क्लोरोजेनिक अॅसिडसारखे अॅंटीऑक्सिडंट्स असतात.
त्वचारोगतज्ज्ञांच्या मते, हे पोषक घटक पोटातली जळजळ कमी करतात, हायड्रेशन वाढवतात, केसांच्या मूळांना आतून पोषण देतात.
चिया चिड्सचे सेवन सतत केल्याने असं दिसून आले की, सतत वापरल्यानंतर त्वचेच्या अडथळ्याच्या कार्यात आणि ओलावा टिकवून ठेवण्यासाठी मदत होते.
चिया तेलाच्या वापरामुळे त्वचेतील ट्रान्सएपीडर्मल वॉटर लॉस कमी होतो आणि हायड्रेशन वाढते, असे संशोधनात दिसून आले आहे.
हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते, खाज सुटते. चिया सीड्समधील अँटिऑक्सिडेंट्स आणि फॅटी अॅसिड्स त्वचेच्या मॉइश्चर बॅरियरला मजबूत करतात.
रोज चिया सीड्स सेवन केल्यास दोन ते चार आठवड्यांत त्वचेची चमक, हायड्रेशन आणि टेक्स्चरमध्ये स्पष्ट फरक जाणवू लागतो.
ओमेगा-3 केसांच्या मुळांना पोषक देतात, तुटणे थांबवतात. झिंक आणि कॉपर केसांच्या फॉलिकल्सना सक्रिय करतात, ज्यामुळे केसांची वाढ वेगाने होते.
चिया सीड्समधील प्रोटीन केराटिनसाठी बिल्डिंग ब्लॉकचे काम करते. त्यामुळे केस शायनी, स्ट्रॉंग आणि घनदार होतात.