Sakshi Sunil Jadhav
आजच्या धावपळीच्या आणि बदललेल्या लाइफस्टाइलमध्ये तरुण वयातच केस पांढरे होण्याची समस्या वाढली आहे. फक्त वय वाढल्यावरच नाही, तर आहारातील पोषणाची कमतरता, ताण, प्रदूषण अव्यवस्था यामुळे केस पांढरे होतात.
विशेषत: व्हिटॅमिन D आणि व्हिटॅमिन B12 यांची कमतरता ही केस पांढरे होण्याचं मोठं कारण मानली जाते. चला जाणून घेऊया कोणती कमतरता केस पांढरे करते आणि ते नैसर्गिकरित्या काळे कसे करता येतात.
तज्ज्ञांच्या मते, व्हिटॅमिन D केवळ हाडांसाठीच नाही तर केसांच्या मुळांसाठीही आवश्यक आहे. त्याची कमी झाल्यास हेअर पिगमेंट कमी होतं आणि केस वेळेआधीच पांढरे दिसतात.
व्हिटॅमिन D मिळवण्यासाठी सकाळची सूर्यप्रकाश, दूध, दही, पनीर, मशरूम, अंडी, सॅल्मन, मॅकरेलसारखी फॅटी फिश, व्हिटॅमिन D सप्लिमेंट्स त्याही डॉक्टरांच्या सल्ल्याने.
व्हिटॅमिन B12 रक्ताभिसरण सुधारतं आणि हेअर फॉलिकल्स मजबूत ठेवते. त्याची कमतरता केसांच्या रंगद्रव्यावर परिणाम करते आणि केस अकाली पांढरे होतात.
जंक फूड, कमी झोप, ताणतणाव आणि प्रदूषणामुळे शरीरातील पोषण संतुलन बिघडते. या कारणांनीही केस अकाली पांढरे होतात.
कांद्याच्या रसामध्ये असलेलं सल्फर केसांच्या मुळांना पोषण देतं. हे स्कॅल्पवरील रक्ताभिसरण वाढवून केस मजबूत करते.
केसांची मूळं मजबूत होतात, कॅटालेज एन्झाइम सक्रिय होतं, पांढरे केस होण्याची प्रक्रिया मंदावते, केसांना नैसर्गिक चमक मिळते, केस गळणे कमी होते.
कांद्याचा रस मिक्सरमध्ये वाटून गाळून घ्या. मग स्कॅल्पवर कॉटनने लावा. ३० मिनिटांनी सौम्य शॅम्पूने धुवा. आठवड्यातून 2-3 वेळा याचा वापर करा.