Sakshi Sunil Jadhav
बजाज ऑटोने ग्राहकांच्या वाढत्या मागणीमुळे ‘Pulsar Hattrick Offer’ पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
ही विशेष ऑफर डिसेंबर महिन्यापर्यंत लागू राहणार असून वर्षाअखेरीस बाइक खरेदीदारांना मोठा फायदा देणार आहे.
ऑफरअंतर्गत Pulsar मालिकेतील विविध मॉडेल्सवर ग्राहकांना ₹15,500 पर्यंत बचत मिळू शकते.
कंपनीने अलीकडील GST रिव्हिजनचा पूर्ण लाभ कोणत्याही कपातीशिवाय थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवला आहे.
फायनान्सद्वारे बाइक खरेदी करणाऱ्यांना झिरो प्रोसेसिंग फीचा लाभ देण्यात आला आहे. याशिवाय इन्शुअरन्सच्या किमतीतही लक्षणीय बचत मिळत असल्याने ऑन-रोड किमतीत चांगला फरक पडतो.
ही ऑफर संपूर्ण भारतातील सर्व Pulsar मॉडेल्सवर लागू असून कोणतेही हिडन चार्जेस नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
दिल्लीसाठी उपलब्ध डेटानुसार Pulsar 125 वर ₹10,900, NS125 ABS वर ₹12,200 आणि N160 वर सर्वाधिक ₹15,700 पर्यंत बचत मिळत आहे.
बजाज ऑटोचा दावा आहे की वर्ष संपण्यापूर्वी ग्राहकांना दिले जाणारे हे सर्वात मोठे सेव्हिंग ऑफर असून बाइक खरेदीसाठी ही अंतिम मोठी संधी आहे.