Simple kitchen tips to keep vegetables fresh  saam tv
लाईफस्टाईल

Kitchen Tips : पालक-मेथी फ्रिजमध्ये ठेवूनही लवकर खराब होतेय? करा हे 5 उपाय, पालेभाज्या अनेक दिवस राहतील ताज्या

Simple kitchen tips to keep vegetables fresh : पालेभाज्या जास्त दिवस फ्रेश आणि टवटवीत ठेवण्यासाठी साध्या आणि सोप्या टिप्स नक्की फॉलो करा. भाजी वाया न घालवता ती दीर्घकाळ साठवून ठेवण्यास यामुळे मदत होईल.

Saam Tv

हिवाळ्यात पालक, मेथी, चाकवत यांसारख्या हिरव्या पालेभाज्या मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध असतात. आरोग्यासाठी पौष्टिक असलेल्या या भाज्या अनेकजण आवडीने खरेदी करतात. मात्र, बाजारातून आणल्यानंतर त्या फ्रिजमध्ये ठेवल्या तरी एक-दोन दिवसांत खराब होतात. पानांना पिवळेपणा येणे, चिकटपणा निर्माण होतो किंवा पाने सडणे अशा समस्या दिसतात. त्यामुळे भाज्या वारंवार खरेदी कराव्या लागतात. मात्र, काही सोप्या पद्धतींचा वापर केल्यास पालेभाज्या अधिक काळ ताज्या ठेवता येतात.

पालेभाज्या ताज्या ठेवण्यासाठी 5 सोपे उपाय

पेपर टॉवेलचा वापर करा

पालक आणि इतर पालेभाज्या लवकर खराब होऊ नयेत, यासाठी पेपर टॉवेलचा वापर करता येतो. सर्वप्रथम भाज्यांमधील सडलेली आणि खराब पाने काढून टाका. त्यानंतर एका डब्यात दोन पेपर टॉवेल ठेवून त्यामध्ये पालेभाज्या गुंडाळून ठेवा. पेपर टॉवेल भाज्यांमधील अतिरिक्त ओलावा शोषून घेतो. त्यामुळे पाने लवकर सडत नाहीत. पेपर टॉवेल जास्त ओला झाल्यास तो बदलणे आवश्यक आहे.

भाज्या धुवून पूर्णपणे कोरड्या करा

बाजारातून भाज्या आणल्यानंतर अनेकजण त्या धुऊन थेट फ्रिजमध्ये ठेवतात. मात्र, पानांवर राहिलेल्या पाण्यामुळे ओलावा वाढतो आणि भाज्या लवकर खराब होतात. त्यामुळे भाज्या धुतल्यानंतर त्या स्वच्छ कापडावर किंवा चाळणीत पसरवून पूर्णपणे कोरड्या होऊ द्याव्यात. त्यानंतरच फ्रिजमध्ये ठेवाव्यात.

हवेशीर पिशवी किंवा डब्याचा वापर करा

पालेभाज्या पूर्णपणे हवाबंद डब्यात ठेवण्याऐवजी हवेशीर पिशवी किंवा जाळीदार पिशवीचा वापर करावा. छिद्रे असलेल्या प्लास्टिकच्या पिशवीत किंवा सुती पिशवीत भाज्या ठेवल्यास त्यातील अतिरिक्त ओलावा बाहेर पडण्यास मदत होते. त्यामुळे भाज्या अधिक काळ ताज्या राहू शकतात.

देठ आणि खराब पाने वेगळी करा

पालेभाज्या मोठ्या प्रमाणात आणल्या असतील, तर साठवण्यापूर्वी त्यातील मुळे आणि अनावश्यक जाड देठ वेगळे करावेत. तसेच पिवळी, सडलेली किंवा खराब झालेली पाने काढून टाकावीत. यामुळे चांगल्या पानांपर्यंत खराबी पसरण्याचा धोका कमी होतो आणि भाज्या अधिक काळ टिकतात.

चिरून साठवण्याची पद्धत वापरा

पालेभाज्या आधीच चिरून ठेवायच्या असतील, तर त्यासाठी योग्य काळजी घ्यावी. सर्वप्रथम भाज्या धुऊन पूर्णपणे वाळवून घ्याव्यात. त्यानंतर आवश्यकतेनुसार चिरून घ्याव्यात. एका डब्यात तळाशी पेपर टॉवेल किंवा स्वच्छ सुती कापड ठेवून त्यावर चिरलेल्या भाज्या पसरवाव्यात. वरूनही कापड किंवा पेपर टॉवेल ठेवून डबा बंद करावा. यामुळे अतिरिक्त ओलावा शोषला जातो आणि भाज्या ताज्या राहण्यास मदत होते.

पालेभाज्या साठवताना त्यातील ओलावा नियंत्रित ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. खराब पाने वेळीच काढणे, भाज्या पूर्णपणे कोरड्या करून ठेवणे आणि हवेशीर पॅकिंगचा वापर करणे या साध्या गोष्टी लक्षात ठेवल्यास भाज्या लवकर खराब होण्यापासून वाचू शकतात. त्यामुळे पैशांची बचत होण्यासोबतच अन्नाची नासाडीही टाळता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ऊस दरासाठी अहिल्यानगरमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार

Death News : प्रसिद्ध दिग्दर्शकावर कोसळला दुःखाचा डोंगर; वडिलांचे निधन, भावुक पोस्ट शेअर

डीलिमिटेशनसाठी राज्यातील खासदारांना 150 कोटी; बड्या नेत्याचा खळबळजनक दावा|VIDEO

Pune News : १९ वर्षीय विद्यार्थिनी लिफ्टमध्ये १४ तास अडकली, पुण्यातील नामांकित कॉलेजमधील धक्कादायक प्रकार

Accident: भरधाव बसची दुचाकीला धडक, एका कुटुंबातील चौघांसह ५ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT