Kitchen Storage Tips Of Onion And Potatoes Saam Tv
लाईफस्टाईल

किचनमध्ये कांदे आणि बटाटे एकत्र ठेवावे की नाही?

Kitchen Storage Tips Of Onion And Potatoes: किचनमध्ये कांदे-बटाटे एकत्र ठेवावे की नाही? इथिलीन वायू, मोड आलेल्या बटाट्यातील सोलानाइनचा धोका आणि कांदे-बटाटे साठवण्याची योग्य पद्धत सविस्तर जाणून घ्या.

Manasvi Choudhary

आहारात कांदे आणि बटाटे हे दोन्ही अत्यंत महत्वाचे मानले जातात. अनेक भाज्यांमध्ये, पदार्थांमध्ये कांदा आणि बटाट्याचा वापर केला जातो. किचनमध्ये कांदे आणि बटाटे एकाच टोपल्यात ठेवले असतात. परंतु कांदा - बटाटे खरच एकत्र ठेवावे का? कांदा - बटाटे एकत्र ठेवल्याने आरोग्यावर काय परिणाम होतो का? ते सविस्तरपणे जाणून घ्या.

अनेक महिला कांदा - बटाटा एकत्र साठवून ठेवतात. कांदा- बटाटे एकत्र ठेवणं खरच योग्य आहे का? याविषयी सोशल मिडिया इन्स्टाग्राम 40plus_mom यामध्ये माहिती देण्यात आली आहे. कांद्यातून इथलिन हा वायू निर्माण होत असतो जर कांदे आणि बटाटे एकत्र ठेवत असाल तर इथलिन या वायुमुळे बटाट्यांना कोंब फुटण्याची प्रक्रिया जलद होते आणि बटाट्यांना कोंब फुटतात ते ओलसर होतात. बटाट्याच्या ओलसरपणामुळे कांदेही लवकर खराब होतात, सडू लागतात. जे खाल्ल्याने आरोग्यासाठी धोकादायक आहे. त्यामुळे कांदे आणि बटाटे नेहमीच वेगवेगळे साठवून ठेवावे.

मोड झालेल्या बटाटा खाल्ल्यास काय होऊ शकते?

अंकुरित म्हणजेच मोड आलेला बटाटा खावे की नाही असा प्रश्न अनेकांना असतो. जेव्हा बटाट्यांना मोड येतो तेव्हा त्यात सोलानाइन नावाचा नैसर्गिक विषारी घटक वाढू लागतो हा घटक काही प्रमाणात सर्वच बटाट्यांमध्ये असतो पण मोड आल्यानंतर त्याचे प्रमाण वाढते यामुळे पोटदुखी, उलटी, मळमळ किंवा फूड पॉइजनिंग होण्याची शक्यता असते.

कांदा- बटाटे साठवून ठेवण्याची योग्य पद्धत कोणती?

कांदे आणि बटाटे कधीही एकाच टोपलीत एकत्र ठेवू नका.

कांदे व बटाटे साठवून ठेवण्यासाठी थंड, कोरड्या आणि मोकळी जागा करा. हवा खेळती राहील अशा ठिकाणी ठेवा.

कांदे किंवा बटाटे हवाबंद प्लास्टिक पिशवीत ठेवू नका, कारण त्यामुळे ओलावा साचून ते लवकर कुजतात. तसेच कच्चे बटाटे व कांदे फ्रीजमध्ये ठेवणेही टाळावे.

टोपलीतील एखादा कांदा किंवा बटाटा खराब झाला असेल, तर तो लगेच बाजूला काढा, जेणेकरून इतर भाज्या खराब होणार नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा तूर्तास रद्द; १२ डिसेंबरला शरद पवारांच्या हस्ते प्रेरणास्थळाचे उद्घाटन

Mumbai : वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदलीनंतर पोलीस ठाण्यात फटाके फोडले! महिला कर्मचाऱ्याच्या कृतीने चर्चांना उधाण

Kitchen Tips : वाटाणे सोलण्याची कटकट आता विसरा! फक्त 3 मिनिटांत होतील वाटाणे सोलून,पाहा भन्नाट ट्रिक

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! आठवा वेतन आयोग कधीपासून लागू होणार? महत्वाची अपडेट समोर

Election: मोठी बातमी! काँग्रेसकडून भाजपचा दारूण पराभव,पंचायत समितीच्या ५१ जागांवर विजयी

SCROLL FOR NEXT