भारतीय घरांमध्ये रोज भात हा पदार्थ आवर्जून बनवला जातो. डाळ-भात असो वा बिर्याणी भात मोकळा आणि सुटसुटीत असेल तर खाण्याची मजाच वेगळी येते. अन्नाची चव आणि सुवास वाढवण्यासाठी लोक विविध खडे मसाले वापरतात, त्यापैकीच एक म्हणजे तमालपत्र.
अनेक घरांमध्ये पुलाव किंवा बिर्याणी बनवताना भातात आवर्जून तमालपत्र घातले जाते.यामुळे भाताला एक छान सुवास येतो, ज्यामुळे डिशची चवही वाढते. पण भातात तमालपत्र घातल्याने केवळ चवच वाढते असे नाही तर त्याचे इतरही अनेक आरोग्यदायी फायदे जाणून घ्या.
भात शिजवताना तमालपत्र टाकल्याने त्याचा सुगंध आणि चव खूप वाढते. तमालपत्रात काही नैसर्गिक घटक असतात. जे शिजवण्याच्या प्रक्रियेदरम्यान भातामध्ये हलकासा मसालेदार सुवास आणि चव उतरवतात.
पारंपारिक पद्धतीनुसार तमालपत्राचा वापर पोटाशी संबंधित समस्यांवर केला जातो.म्हणूनच पुलाव किंवा बिर्याणीचा भात बनवताना एक तमालपत्र घालण्याचा सल्ला दिला जातो. भात खाल्ल्याने जर पोटात गॅस होत असेल किंवा तुम्ही काहीतरी जड जेवण बनवत असाल, तर जेवणात एक तमालपत्र घालणे हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
तमालपत्रात काही अशी नैसर्गिक संयुगे असतात जी अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असतात.हे अँटीऑक्सिडंट्स शरीरातील ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास मदत करतात आणि संपूर्ण आरोग्याला निरोगी ठेवतात.
सोशल मीडियावर काही लोक असा दावा करतात की, भात शिजवताना तमालपत्र टाकल्याने आर्सेनिकची पातळी कमी होते. मात्र, हे पूर्णपणे सत्य नाही. यूएस फूड अँड ड्रग एडमिनिस्ट्रेशन (FDA) नुसार, भात जास्त पाण्यात शिजवून अतिरिक्त पाणी फेकून दिल्यास त्यातील आर्सेनिकचे प्रमाण ४० ते ६० टक्क्यांनी कमी होऊ शकते.
सर्वप्रथम भात स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घ्या. त्यानंतर तो काही वेळ पाण्यात भिजवून ठेवा. भाताच्या प्रमाणानुसार पाणी घाला आणि त्यात एक छोटे तमालपत्र टाका. आता नेहमीच्या पद्धतीने भात शिजू द्या.भात शिजल्यानंतर तमालपत्र काढून टाका आणि गरमागरम सर्व्ह करा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.