पदार्थ तळण्यासाठी योग्य तेल नेमकं कोणतं? सणासुदीच्या काळात पदार्थ बनवताना लक्षात ठेवाव्या ५ महत्त्वाच्या गोष्टी

Best Cooking Oils for Deep Frying : सणासुदीच्या काळात गरमागरम आणि चविष्ट तळलेले पदार्थ बनवताना योग्य तेलाची निवड करणे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असते. योग्य तेल निवडल्यास पदार्थांची चव तर वाढतेच,शिवाय आरोग्यही जपले जाते.
BEST OIL FOR DEEP FRYING AND 5 ESSENTIAL FESTIVE COOKING TIPS
BEST OIL FOR DEEP FRYING AND 5 ESSENTIAL FESTIVE COOKING TIPS SAAM TV
Published On: 

सण म्हटला की घरी गरमागरम पुरी,भाजी आणि वेगवेगळे पक्वान्न तयार होतात.विशेषतः दिवाळी किंवा इतर सणासुदीला फराळासाठी तेला-तुपाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. तळलेले पदार्थ कितीही चविष्ट असले, तरी ते तळण्यासाठी कोणते तेल वापरले जात आहे याचा आरोग्यावर थेट परिणाम होतो हे जाणून घेणे महत्वाचे आहे. बाजारात अनेक प्रकारची खाद्यतेलं उपलब्ध असल्यामुळे तळण्यासाठी नेमके कोणते तेल निवडावे हे जाणून घ्या.

पदार्थ तळण्यासाठी उत्तम मानले जाणारे ५ तेलाचे पर्याय

राइस ब्रॅन ऑइल

तांदळाच्या कोंड्यापासून तयार केलेले हे तेल डीप फ्रायिंगसाठी उत्तम मानले जाते. यामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात.या तेलाचा स्मोक पॉइंट जास्त असल्यामुळे योग्य तापमानावर पदार्थ तळण्यासाठी ते वापरता येते. तसेच याची चव सौम्य असल्यामुळे पदार्थाच्या मूळ चवीवर परिणाम होत नाही.

रिफाइंड ऑलिव्ह ऑइल

ऑलिव्ह ऑइल प्रामुख्याने सॅलडसाठी वापरले जाते असे वाटते, परंतु 'रिफाइंड ऑलिव्ह ऑइल'चा स्मोक पॉइंट जास्त असतो. त्यात मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्सही असतात. एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल आणि रिफाइंड ऑलिव्ह ऑइलचे गुणधर्म वेगवेगळे असतात. त्यामुळे तळताना तेलाचा योग्य प्रकार आणि पॅकेटवरील सूचना तपासाव्यात.

BEST OIL FOR DEEP FRYING AND 5 ESSENTIAL FESTIVE COOKING TIPS
50 वर्षांपेक्षा कमी असलेल्या महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर झपाट्याने का वाढत आहे? तज्ज्ञांनी सांगीतले यामागील खरे कारण

सुर्यफूल तेल

सुर्यफूलाच्या बियांपासून तयार होणारे हे तेल पुरी किंवा इतर पदार्थ तळण्यासाठी वापरता येते. या तेलातील असंतृप्त फॅट्सचे प्रमाण प्रकारानुसार बदलते. काही प्रकारांमध्ये स्मोक पॉइंट जास्त आणि चव सौम्य असते,त्यामुळे पॅकिंगवरील माहिती वाचून हे तेल निवडावे.

शेंगदाणा तेल

भारतीय स्वयंपाकघरात शेंगदाणा तेलाचा वापर पारंपरिकरीत्या मोठ्या प्रमाणावर केला जातो. याचा स्मोक पॉइंट जास्त असल्याने पुरी, भजी आणि इतर तळलेले पदार्थ तयार करण्यासाठी हे योग्य ठरते. ज्यांना शेंगदाण्याची ॲलर्जी आहे, त्यांनी हे तेल वापरताना विशेष काळजी घ्यावी.

BEST OIL FOR DEEP FRYING AND 5 ESSENTIAL FESTIVE COOKING TIPS
Healthy Habits : दररोज सकाळी स्वतःसाठी राखून ठेवा ३० मिनिटे; 'या' सवयी तुम्हाला ठेवतील निरोगी आणि फिट

देशी तूप

सणासुदीला काही पदार्थ तुपात तळण्याचा पर्याय अनेकांना आवडतो.यामुळे पदार्थांना खास चव आणि सुवास मिळतो. तुपाचा स्मोक पॉइंट जास्त असला तरी त्यात सॅच्युरेटेड फॅट्सचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे कोलेस्ट्रॉल किंवा हृदयाच्या आरोग्याची समस्या असल्यास तुपाचा वापर मर्यादित ठेवावा.

पुरी किंवा पदार्थ तळताना या ५ चुका टाळा

  • एकाच तेलात पुन्हा पुन्हा पदार्थ तळल्याने त्यात हानिकारक घटक तयार होतात. शक्यतो तेलाचा पुनर्वापर टाळा.

  • तेलाचा धूर निघू लागेपर्यंत ते गरम करणे टाळा. तेल योग्य तापमानाला आल्यानंतरच पदार्थ तळा.

  • केवळ स्मोक पॉइंट न बघता तेलातील फॅट्सचा प्रकार आणि आरोग्याची स्थिती लक्षात घेऊन तेल निवडा.

  • तळल्यानंतर पदार्थ काही वेळ टीश्यु पेपर ठेवल्यास पृष्ठभागावरील अतिरिक्त तेल निघून जाण्यास मदत होते.

  • कोणतेही चांगले तेल वापरले तरी डीप फ्राय केलेले पदार्थ नेहमी मर्यादित प्रमाणातच खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com