Kidney health tips, Tips, Health issue ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Kidney health tips : किडनीचे आरोग्य सांभाळायचे आहे ? तर या पदार्थांपासून दूर रहा

कोणत्या पदार्थांमुळे किडनीला त्रास होतो ?

कोमल दामुद्रे

मुंबई : आपल्या किडनीचे आरोग्य हे आपली जीवनशैली व खाण्यापिण्याच्या सवयींवर अवलंबून असते. जेव्हा एखाद्या व्यक्तीला मूत्रपिंडाचा आजार असतो तेव्हा त्याच्या रक्तातील अतिरिक्त कचऱ्याचे प्रमाण वाढू लागते. अशा परिस्थितीत ही स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि किडनीचे आरोग्य बरे करण्यासाठी डॉक्टर (Doctor) आहारात बदल सुचवतात.

हे देखील पहा -

मूत्रपिंड हे मानवी शरीरातील काम करणारा महत्त्वाचा अवयव आहे. आपण जे काही अन्नपदार्थ खातो किंवा पितो त्यातून विषारी घटक बाहेर काढून टाकण्यास मदत होते. रोज लघवीद्वारे आपल्या रक्तातील सुमारे १५०० मिली कचरा किंवा घाण काढून टाकतात. याशिवाय, ते शरीरातील खनिज संतुलन नियंत्रित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. याशिवाय लाल रक्तपेशींचे उत्पादन वाढवणारे हार्मोन्सही तयार होतात. कोणत्या पदार्थांचे आहारत सेवन करु नये हे जाणून घ्या.

वय, उच्च रक्तदाब, हृदयविकार, अल्कोहोलचा वापर आणि डायबिटीज, हिपॅटायटीस सी व्हायरससह मूत्रपिंडांवर परिणाम होऊ शकतो. या प्रकरणात, सोडियम आणि संतृप्त चरबीचे सेवन मर्यादित करणे हा धोका कमी करण्याचा आणि मधुमेह आणि उच्च रक्तदाब व्यवस्थापित करण्याचा एक चांगला मार्ग आहे.

बेकन, सॉसेज, हॉट डॉग, डेली मीट आणि बर्गर पॅटीज यांसारखे प्रक्रिया केलेले मांस किडनीच्या आरोग्यासाठी दुहेरी धोका निर्माण करतात. त्यात सोडियमचे प्रमाण जास्त असते. ब्लड प्रेशरचा अतिरिक्त तणाव निर्माण होतो.

व्हाईट ब्रेड क्रस्ट, उच्च सोडियम टोमॅटो सॉस, चीज आणि सॉसेज किंवा पेपरोनी सारख्या प्रक्रिया केलेले मांस वापरून बनवलेला पिझ्झा खात असाल तर किडनीच्या आरोग्याला (Health) इजा करते त्यात असणारे सोडियम मूत्रपिंडाचा आजार होतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाला मोठा धक्का, गुहागरमधील नेत्या शिवसेनेत प्रवेश करणार

Malshej Ghat Kalu Waterfall Tragedy : मुसळधार पावसामुळे नदीला अचानक पूर, ३०० पर्यटक अडकले; सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

Biscuits Side Effects: तुम्हालाही बिस्कीट खायला आवडतं? पण होतात 'हे' गंभीर परिणाम, एकदा वाचाच

Mansa Devi Temple: शॉर्ट सर्किटची अफवा; अरुंद पायऱ्या आणि फक्त एकच रस्ता, मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी ; थरकाप उडवणारा Video Viral

Rakshabandhan 2025: वास्तुशास्त्रानुसार, रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला 'या' भेटवस्तू देऊ नका

SCROLL FOR NEXT