किडनीच्या कॅन्सरचा धोका हा ६५ ते ७४ वयोगटातील लोकांना आहे.
किडनीच्या कॅन्सरच्या आजाराची लक्षणे ही सामान्य आजारांसारखी असतात.
जीवनशैलीवर नियंत्रण ठेवले तर भविष्यात आजारांपासून लांब राहता येते.
किडनी कॅन्सरचा आजार वाढत चालला आहे.
तुम्ही जितके पौष्टीक अन्न सेवन करता तेवढे तुमचे शरीर योग्य प्रकारे कार्य करते. सध्याच्या धावपळीच्या वातावरणात लोकांना घरचे पौष्टीक अन्न मिळत नसल्याचे जाणवते. त्यामुळे लोक बाहेरचे पदार्थ खाणे पसंत करतात. मात्र याचा परिणाम थेट तुमच्या शरीरात होत असतो. तुम्हाला नकळत अनेक गंभीर आजारांना सामारे जावे लागते. त्यातील एक जीवघेणा आजार म्हणजे किडनी कॅन्सर.
प्रसारित झालेल्या एका अहवालानुसार तज्ज्ञांनी असे संकेत दिले आहेत की, २०५० पर्यंत किडनी कॅन्सरच्या समस्या दुप्पट वाढणार आहेत. या आजाराची प्रमुख लक्षणे ही अत्यंत साधी आणि नेहमीच्या सामान्य आजारांसारखी असतात. याबद्दल पुढील बातमीत ठळक लक्षणं आणि सामान्य लक्षणे कशी ओळखायची? याची माहिती दिली आहे.
किडनीच्या कॅन्सरची लागण विशेषत: लठ्ठपणा, धुम्रपान, डायबेटीज, व्यायामाचा अभाव आणि ब्लड प्रेशर जास्त असणाऱ्या व्यक्तींना होते. तज्ज्ञांच्या मते तुम्ही काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. त्यामध्ये वजन कमी करणं हा सगळ्यात महत्वाचा सल्ला आहे. वजन वाढण्याचे कारण म्हणजे तुम्ही तुम्ही चुकीचा आहार घेत आहात. त्यानेच तुमच्या शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. भविष्यात तुम्हाला वाढत्या ब्लड प्रेशरच्या समस्येला सामोरे जावे लागते. तसेच तुम्ही धुम्रपान टाळले पाहिजे. याने तुम्हाला किडनीचा कॅन्सर होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात टळू शकतो.
किडनीच्या कॅन्सरचा धोका हा ६५ ते ७४ वयोगटातील लोकांना सर्रास होतो. महिलांपेक्षा हा धोका पुरुषांना जास्त प्रमाणात असतो. तर लहान मुलांमध्ये हा आजार क्वचित आढळतो. किडनी कॅन्सरच्या लक्षणांमध्ये लघवीतून रक्त, पाठ किंवा तोंडाच्या भागात गाठ, कमरेजवळ दुखणे, भूक नसणे, थकवा, वजन कमी होणे, ताप, अस्वस्थता, सतत घाम येणे, एनीमिया यांसारखी लक्षणे आढळल्यास तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.