Kia Seltos Feature, Price, Mileage; Information in Marathi Kia Seltos - Saam Tv
लाईफस्टाईल

Kia Seltos च्या किंमतीत मोठी कपात, देते 20 किमीचा मायलेज; जाणून घ्या नवीन किंमत

साम टिव्ही ब्युरो

Kia Seltos Price Cut :

वाहन उत्पादक कंपनी Kia Motors ने Seltos च्या किमतीत कपात केली आहे. ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. कारची किंमत 2000 रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे. ही कार एक्स-शोरूम 10.90 लाख रुपयांच्या प्रारंभिक किमतीत उपलब्ध आहे.

किंमत कमी केल्यानंतर आता कारमधील एक महत्त्वाचे फिचरही कमी करण्यात आले आहे. आता बटणाच्या एका टचने कारमधील खिडकीच्या काचा खाली करण्याचा पर्याय नसेल. आता ही सुविधा फक्त ड्रायव्हर सीटवरच मिळणार आहे. आता कारच्या फक्त X-Line ट्रिममध्ये बटणाच्या टचने चारही खिडक्यांच्या काचा कमी आणि वाढवण्याची सुविधा असेल.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

इंजिन पर्याय आणि किंमत

अलीकडेच कंपनीने कारचे अपडेटेड व्हर्जन लॉन्च केले होते. कंपनीने या कारची किंमत 30,000 रुपयांनी वाढवली होती. या कारचे इंजिन 1.5 लिटर टर्बो पेट्रोल iMT HTX+, 1.5 पेट्रोल MT HTX, 1.5 टर्बो पेट्रोल DCT GTX+(S), 1.5 लिटर डिझेल iMT HTX+, 1.5-टर्बो पेट्रोल DCT GTX+, आणि 1.5-लिटर GTX+ डिझेल (GXAT+) आहेत. आता ही कार 2000 रुपये कमी किमतीत उपलब्ध होणार. (Latest Marathi News)

Kia Seltos

ही फॅमिली एसयूव्ही आहे, यात 433 लीटरची बूट स्पेस आहे. डिझेल इंजिनवर कारला 20.7 kmpl पर्यंत कमाल मायलेज मिळते. Kia Seltos मध्ये 11 रंग पर्याय उपलब्ध आहेत. ही किया कार 116 पीएस पॉवर जनरेट करते. कारमध्ये एअरबॅग्ज, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टमसह दोन ट्रान्समिशन दिले जात आहेत. या कारमध्ये 6 स्पीड आणि 7 स्पीड गिअरबॉक्स असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. कारमध्ये अलॉय व्हील आणि 10.25-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे.

क्लाइमेट कंट्रोल आणि ट्यूबलेस टायर

कारचे टॉप मॉडेल 20.30 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे. ही एक फाय सीटर कार आहे, ज्यामध्ये क्लाइमेट कंट्रोल आणि ट्यूबलेस टायर आहेत. Kia Seltos ची स्पर्धा MG Astor, Hyundai Creta, Volkswagen Taigun, Skoda Kushaq आणि Maruti Grand Vitara सारख्या कारशी आहे. ही कार इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोलसह येते. कारमध्ये 360 डिग्री कॅमेरा देण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Alert : आजपासून या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळणार, हवामान खात्याचा अलर्ट

Horoscope Today : नोकरी आणि व्यवसायात यश मिळेल, जोडीदाराची भेट होईल, आज तुमच्या नशिबात काय लिहिलंय?

Horoscope Today : आज धाडसाने अनेक गोष्टी कराल, नको ती जबाबदारी अंगावर येऊन पडणार; वाचा आजचे राशीभविष्य

IND-W vs NZ -W: टीम इंडियाच्या फलंदाजांचा फ्लॉप शो! पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडकडून दारुण पराभव

Pune News: पुण्याचं बदलापूर होतंय, वाचा स्पेशल रिपोर्ट...

SCROLL FOR NEXT