Most Confusing Workplace  Saam tv
लाईफस्टाईल

Most Confusing Workplace : नवीन कर्मचाऱ्यांचे टेन्शन वाढलं ! आधीच कामाचा व्याप त्यात विशेष भाषेमुळे डोक्याला ताप...

Career Point : तुमच्या करिअरच्या ठिकाणी भाषेच्या बदलणाऱ्या रुपामुळे तुमचा गोंधळ उडू शकतो.

कोमल दामुद्रे

LinkedIn-Duolingo Survey : आपल्या जीवनाची खरी सुरुवात ही भाषेमुळेच होते. लहानपणांपासून शिकलेली भाषा, शाळा-कॉलेजमध्ये बदलले जाणारे भाषेचे स्वरुप काही वेगळे नाही. पण अशातच तुमच्या करिअरच्या ठिकाणी भाषेच्या बदलणाऱ्या रुपामुळे तुमचा गोंधळ उडू शकतो.

LinkedIn व Duolingo सर्व्हेतून स्पष्ट केले आहे की, विशेष भाषेमुळे अनेक कर्मचाऱ्यांचा गोंधळ उडाला आहे. संशोधनानुसार ८४ टक्‍के मुंबईकर म्‍हणतात की, कामाच्या ठिकाणी वापरली जाणारी विशेष भाषा स्‍वत:हून समजण्‍यास प्रवृत्त करण्‍यात आले. परिणामत: मुंबईतील (Mumbai) १० पैकी ३ व्यावसायिक दावा करतात की त्‍यांनी विशिष्‍ट भाषेचा चुकीचा अर्थ घेतल्‍याने कामाच्‍या ठिकाणी चूकीच्या गोष्टींना सामोरे जावे लागत आहे.

८० टक्‍के कर्मचारी म्हणतात की त्यांच्या सोबत काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांसाठी ही नवी संधी आहे तर काहींना याबाबत संघर्ष करावा लागतो आहे. देशभरातील संशोधनामधून निदर्शनास आले की विशेष भाषा आहे, जी भारतीयांना कामाच्‍या ठिकाणी सर्वात गोंधळात टाकणारी वाटते. 'कीप मी इन द लूप' हा शब्द कर्मचाऱ्यांना (Employee ) अधिक गोंधळात टाकतो.

याचा अर्थ असा की एखाद्याला विषयाबाबत माहिती देणे किंवा अपडेटेड ठेवणे. यांसारखी इतर अनेक वाक्ये आहेत जी गोंधळात टाकतात टेक ऑफलाइन (व्‍हर्च्‍युअलपासून दूर वैयक्तिक सेटिंगमध्‍ये काहीतरी चर्चा करणे), विन-विन सिच्‍युएशन(समाविष्‍ट असलेल्‍या सर्व पक्षांसाठी अनुकूल परिणाम) आणि कोअर कॉम्‍पीटन्‍सी(क्षमता, ज्‍या कर्मचाऱ्याच्‍या ताकदीला परिभाषित करतात).

भाषेमुळे कामाच्या ठिकाणी असमानता निर्माण होत आहे असे देखील सांगण्यात आले. तर १० पैकी ८ भारतीय (India) व्‍यावसायिकांचा विश्‍वास आहे की, कामाच्या ठिकाणी भाषेच्या विशेष वापरामुळे इतर कर्मचाऱ्यांना कामामध्ये पुढे जाण्याची संधी मिळू शकते. तर ऑनसाइट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्‍या तुलनेत रिमोट व हायब्रिड कर्मचाऱ्यांना कामाच्‍या ठिकाणी विशेष भाषेसंदर्भात संघर्ष करावा लागतो.

कामाच्‍या ठिकाणी काही प्रमाणात विशेष भाषेचा वापर अपेक्षित असले तरी संशोधनामधून निदर्शनास आले की, ७८ टक्‍के भारतीय व्‍यावसायिकांना वाटते की कामाच्‍या ठिकाणी विशेष भाषेचा अतिवापर केला जातो. ३४ टक्‍के व्‍यावसायिक सांगतात की ते प्रत्‍येक वेळी विशेष भाषेचा वापर करतात आणि त्‍यांच्‍या शब्‍दसंग्रहाचा भाग आहे. खरेतर जवळपास ३ पैकी एका भारतीय व्‍यावसायिकाला विशेष भाषेने भारावून टाकल्‍यासारखे वाटते. ते म्‍हणतात की, त्‍यांचे सहकारी त्‍यांना न समजणाऱ्या भाषेत बोलतात.

कामाच्‍या ठिकाणी विशेष भाषेच्‍या वापरामुळे संवादामध्‍ये अडथळा येऊन गोंधळ निर्माण होऊ शकतो. निम्‍म्‍याहून अधिक भारतीय व्‍यावसायिक म्‍हणतात की, त्‍यांना कामाच्‍या ठिकाणी वापरल्‍या जाणाऱ्या विशेष भाषेचा अर्थ न समजल्‍यामुळे किंवा चुकीचा वापर केल्‍यामुळे गैरसमजाचा सामना करावा लागला किंवा कामाच्‍या ठिकाणी त्‍यांची चूक झाली. जनरेशन झेड आणि मिलेनियल्‍स या गोष्‍टीचा अधिक अनुभव घेत आहेत. अधिकाधिक भारतीयांची कामाच्‍या ठिकाणी विशेष भाषेचा वापर दूर किंवा कमी करण्‍याची इच्‍छा आहे.

लिंक्‍डइन व ड्युओलिंगच्या सर्व्हेतून इतरांना असे वाटते विशेष भाषेमुळे उत्तम उत्‍पादकता, चांगली टीम व सकारात्‍मक कामकाज संस्‍कृतीला चालना मिळू शकते. पण काहींनी सांगितले की कामाच्‍या ठिकाणी विशेष भाषेचा विशेषत: नवीन टीमच्या कार्यक्षमतेवर नकारात्‍मक परिणाम होतो

व्‍यावसायिकांना कामाच्‍या ठिकाणी विशेष भाषेचा सामना करण्‍यामध्‍ये मदत करण्यासाठी लिंक्‍डइन मोफत लिंक्‍डइन लर्निंग कोर्सेस प्रदान करत आहे, जसे Communication and cultural differences, Foundations of communication, Why authentic communication matters, Nano tips for communicating with confidence, Nano Tips to Enhance Your Communication आणि Nano Tips for Developing Magnetic Charisma, जे व्‍यावसायिकांना कामाच्‍या ठिकाणी प्रभावी संवाद उत्तमपणे समजण्‍यास मदत करण्यासाठी मोफत १३ जून ते १३ जुलै २०२३ पर्यंत उपलब्‍ध आहेत.

1. मुंबईमध्‍ये सर्वाधिक वापरले जाणारे बिझनेस जार्गन आहेत:

  • बी२सी (बिझनेस टू कस्‍टमर)

  • बी२बी (बिझनेस टू बिझनेस)

  • ईओडी (एण्‍ड ऑफ डे)

2. भारतातील कामाच्‍या ठिकाणी गोंधळात टाकणारी विशेष भाषा:

  • कीप मी इन द लूप

  • टेक ऑफलाइन

  • विन-विन सिच्‍युएशन

  • कोअर कॉम्‍पीटन्‍सी

  • व्‍हॅल्‍यू-अॅड

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed News : बीडमध्ये पावसाचा कहर; जिल्ह्यातील शाळा-कॉलेजला उद्या सुट्टी जाहीर

BMC Election 2025 : ठाकरे बंधू एकत्र, मुंबई महापालिका कोण जिंकणार? भाजप नेत्यांचं मोठ भाष्य, VIDEO

Pune Rain: लोणी काळभोरमध्ये पावसाचं थैमानं, शेती पाण्याखाली, घरात शिरलं पाणी; पाहा ड्रोन VIDEO

India Pakistan Cricket Match:भारताने पाकिस्तानला हरवले, पण पहलगाम हल्ल्यामुळे देशभरात क्रिकेटचा उत्साह ठप्प

Akola Accident : अकोल्यात रेल्वे स्थानकावर भयंकर अपघात; उतरताना प्रवासी ट्रेन अन् फलाटाच्या फटीत अडकला

SCROLL FOR NEXT