Weight Loss Tea SAAM TV
लाईफस्टाईल

Weight Loss Tea : वजन कमी करण्यासाठी 'हा' गुलाबी चहा ठरतो फायदेशीर, रोज सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने पोटीची ढेरी होईल गायब

Pink Tea Benefits : रोज सकाळी गुलाबी चहा प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत मिळते. हा गुलाबी चहा बनवायचा कसा आणि त्याचा वापर कसा करायचा, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

वजन कमी करण्यासाठी गुलाबी चहा मदत करतो.

सकाळी उपाशीपोटी चहा पिणे फायदेशीर ठरते.

पोटाची चरबी झपाट्याने कमी होते.

काश्मीरच्या सुंदर खोऱ्यांमध्ये लोकप्रिय असलेला काश्मिरी पिंक टी म्हणजेच गुलाबी चहा हा केवळ चवीसाठीच नव्हे, तर त्याच्या खास बनवण्याच्या पद्धतीमुळेही प्रसिद्ध आहे. गुलाबी रंग, सौम्य चव आणि सुगंध यामुळे हा चहा अनेक चहाप्रेमींच्या पसंतीस उतरतो. आजकाल वजन कमी करण्यासाठी विविध प्रकारचे चहा आणि हेल्दी ड्रिंक्स लोकप्रिय होत आहेत. त्यामध्ये काश्मिरी पिंक टीचाही समावेश केला जातो.

काश्मिरी पिंक टी म्हणजे काय?

काश्मिरी पिंक टीला 'नून चाय', 'गुलाबी चहा' किंवा 'कश्मीरी चहा' असेही म्हटले जाते. हा चहा पारंपरिक पद्धतीने ग्रीन टीची पाने, पाणी, बेकिंग सोडा आणि दूध यांच्या मदतीने तयार केला जातो. या चहाला आकर्षक गुलाबी रंग असतो. काही ठिकाणी त्यामध्ये मीठ घातले जाते, तर काही आधुनिक प्रकारांमध्ये साखर, बदाम आणि पिस्त्यांचा वापर केला जातो. काश्मीरमध्ये हा चहा थंडीच्या दिवसांमध्ये विशेष लोकप्रिय आहे.

वजन कमी करण्यासाठी काश्मिरी पिंक टी फायदेशीर?

काश्मिरी पिंक टी हा वजन कमी करण्यासाठी काही प्रमाणात मदत करते. या चहाच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. चहामधील कॅफिनमुळे काही काळ ऊर्जा आणि उत्साह वाढतो. वजन कमी करण्यासाठी तुम्ही कमी साखरेचा किंवा साखर न घातलेला चहा प्या. हा चहा सकाळी रिकाम्या पोटी पिणे फायदेशीर ठरते. मात्र ॲसिडिटीचा त्रास असल्यास रिकाम्या पोटी चहा पिणे टाळावे.चहासोबतच संतुलित आहार घ्या. दररोज नियमित व्यायाम करा. पुरेशी झोप घ्या. शरीराला आवश्यक तेवढे पाणी प्या.

काश्मिरी पिंक टी बनवण्याची सोपी पद्धत

साहित्य - पाणी, काश्मिरी ग्रीन टीची पाने, बेकिंग सोडा, दूध, बदाम, पिस्ते, मीठ किंवा साखर इत्यादी साहित्य लागते.

कृती - काश्मिरी पिंक टी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये काश्मिरी ग्रीन टीची पाने आणि चिमूटभर बेकिंग सोडा घाला. हे मिश्रण मंद आचेवर साधारण १० ते १५ मिनिटे उकळवा. चहाचा रंग गडद झाल्यानंतर त्यामध्ये थोडे थंड पाणी घालून चहा फेटा. आता त्यामध्ये दूध घालून पुन्हा काही मिनिटे उकळवा. चहा गाळून कपामध्ये घ्या आणि वरून बारीक चिरलेले बदाम व पिस्ते घाला. अशा प्रकारे घरच्या घरी स्वादिष्ट काश्मिरी पिंक टी तयार होईल.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonia Gandhi : आणीबाणीचा निर्णय चुकीचा होता, सोनिया गांधींच्या त्या विधानाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या

Maharashtra News Live Update: शेतकऱ्यांच्या घरी देवेंद्र फडणवीस यांनी साजरी केलेली दिवाळी हा क्षण मनाला स्पर्श करणारा

Diwali Weight Loss Tips: कितीही फराळ खाल्ला तरी वजन वाढणार नाही, फक्त घरी १० मिनिटं करा 'हा' एक व्यायाम

UPSC ची तयारी, KBC मध्ये सहभाग अन् शेवटी 'चोर'! बीटेक पदवीधराच्या अंगावर काटा आणणाऱ्या प्रवासाची थरारक कहाणी

Pune : पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वात मोठे बसस्थानक; 825 कोटींचा पुनर्विकास प्रकल्प

SCROLL FOR NEXT