Karwa Chauth 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Karwa Chauth 2023 : 'करवा चौथ' च्या व्रतात सासू सुनेला का देते सरगी? थाळीत काय काय असते? जाणून घ्या

Sargi Thali : चौथच्या व्रतमध्ये सासू सुनेला सरगी देते, करवा चौथ व्रताची सरगी म्हणजे काय?

कोमल दामुद्रे

Karwa Chauth 2023 Sargi Thali :

करवा चौथचा उपवास हा स्त्रियांसाठी अधिक खास असतो. प्रत्येक विवाहित स्त्री आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी या दिवशी उपवास करते. यंदा हा व्रत १ नोव्हेंबरला साजरा केला जाणार आहे.

या दिवशी स्त्रिया सकाळी लवकर उठून आंघोळ करुन सरगी (अन्नपदार्थ)खातात. त्यानंतर दिवसभर अन्न आणि पाणी न पिता सायंकाळी चंद्र दिसल्यानंतर हा उपवास सोडतात. तसेच आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे अशी प्रार्थना देखील करतात. करवा चौथच्या व्रतमध्ये सासू सुनेला सरगी देते, करवा चौथ व्रताची सरगी म्हणजे काय? ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला यंदा करवा चौथचा उपवास केला जाणार आहे. १ नोव्हेंबरला बुधवारी हा उपवास केला जाईल. स्त्रिया नेहमी सूर्योदयापूर्वी सरगी खाऊन उपवास सुरू करतात. सासू ही सरगी आपल्या सुनेला देते. सरगीच्या थाळीत काय होते ते जाणून घेऊया.

1. सरगीच्या ताटात काय असते?

सरगी हा एक प्रकारचा शुगन समजला जातो. जो सासू आपल्या सुनेला देते. या थाळीमध्ये ड्रायफ्रुट्स (Dry fruits), मेकअपचे सामान, फळे आणि मिठाई असते. सूर्योदयापूर्वी लवकर उठून यातील अन्नपदार्थांचे सेवन करावे आणि रात्री चंद्राला पाहून उपवास सोडला जातो. तसेच यामध्ये अधिक महत्त्व असते ते फेणीला. ही फेणी दूध, साखर, केशर आणि सुका मेवा मिसळून खीर बनवली जाते. जी शेवयासारखी दिसते. यात दिवसभर शरीराला प्रथिने आणि फायबर मिळावे यासाठी आहारात पनीर (Paneer) पराठा देखील खाल्ला जातो.

उपवासापूर्वी नारळ पाणीचे (Coconut Water) सेवन करु शकता. यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स असतात आणि तुम्हाला दिवसभर हायड्रेट ठेवण्यास मदत होते. यामध्ये नैसर्गिक साखर असते जी शरीराला ऊर्जा देण्यास मदत करते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health: घसादुखीमुळे होऊ शकतात ५ धोकादायक आजार, चुकूनही दुर्लक्ष करु नका, अन्यथा...

ITBP Recruitment: १२ वी पास तरुणांना ITBP मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, महिना ९२००० रुपये पगार, अर्ज कसा करावा?

Astro Tips: हातात घड्याळ घालताय? या चुका टाळा अन्यथा...

'ये तुम्हारे कर्मों का फल है...'चाहत अन् रजतमध्ये कडाक्याचे भांडण 'Bigg Boss' मध्ये मोठा ड्रामा, पाहा VIDEO

Maharashtra News Live Updates: मुंबईच्या पोलिस नियंत्रण कक्षाला बाॅम्ब ठेवल्यााबाबत धमकीचा फोन

SCROLL FOR NEXT