Kaju Katli Saam Tv
लाईफस्टाईल

Kaju Katli: काजूकतलीचा शोध कसा लागला माहितीये? जाणून घ्या

Kaju Katli : काजूकतलीचा शोध कसा लागला हे जाणून घ्या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Kaju Katli Innovation:

सणासुदीच्या दिवसात सर्वांच्या घरात एक मिठाई कॉमन असते ती म्हणजे काजूकतली. काजूकतली ही प्रत्येक सणासुदीला घरात आणली जाते. काजूकतली देऊन प्रत्येकजण आपला आनंद साजरा करतो. मग ते मुलाला चांगले मार्क्स पडले असो किंवा लग्न असो काजूकतली वाटली जाते. परंतु तुम्हाला माहितीये का काजूकतलीचा शोध कसा लागला.

काजूकतली खाण्यासाठी एकदम चविष्ट असते. काजूकतली खाऊन प्रत्येकजण आपला आनंद द्विगुणीत करतो. परंतु काजूकतलीच्या शोध अगदी पुरातन काळाशी जोडलेला आहे.

काजूकतलीचा शोध

काजूकतलीचा शोध १६ शतकात मराठा साम्राज्याच्या राजघराण्यातील प्रसिद्ध आचारी (शेफ) भीमराव यांनी लावला आहे असे म्हटले जाते. भीमरावांकडे नवीन मिठाई तयार करण्याचे काम होते. त्यावेळी त्यांनी हा शोध लावला आहे. भीमरावांनी पारशी गोड हलवामध्ये बदामाऐवजी काजू वापरले. तेव्हापासून काजू कतलीचा शोध लागला.

काजू कतलीचा शोध मुघल काळात लागला अशीही एक कथा आहे. शीख गुरुंना आदरांजली वाहण्यासाठी जहांगीरांने शाही स्वयंपाकघरात काजू कतली बनवली होती असे म्हटले जाते. काही लोक म्हणतात की, जहांगीराच्या शाही आचाऱ्याने दिवाळीच्या काळात काजू, साखर आणि तुपापासून मिठाई तयार केली होती. त्यानिमित्ताने ही मिठाई वाटली होती. त्यामुळे ही मिठाई सर्वत्र लोकप्रिय झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिवसेना कुणाची? सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने ठाकरेसेनेला फटकारले; बेजबाबदार वक्तव्य थांबवा

PM Modi UAE Visit: तेल साठे ते एलपीजी पुरवठा; पंतप्रधान मोदींच्या यूएई दौऱ्यातून भारताला काय मिळाले?

Tragic Road Accident : भीषण अपघात! ट्रक धडकल्यानंतर प्रवाशांनी भरलेला ट्रॅक्टर तुंगभद्रा पुलावरून कोसळला, ६ जणांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: नागपूरचे तापमान 45 अंश सेल्सिअसवर पोहचले

Shocking: पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना, २ महिलांचे केस कापून अर्धनग्न करत धिंड काढली

SCROLL FOR NEXT