Manasvi Choudhary
सर्वत्र दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
सणासुदीच्या काळात मिठाईला मोठ्या प्रमाणात मागणी असते..
यामुळे मिठाई घेताना ती भेसळयुक्त आहे की नाही ते तपासून पाहा.
मिठाई विकत घेताना ती हातावर घेऊन पाहावी. जर मिठाईचा रंग हाताला लागला तर ती मिठाई विकत घेऊ नका.
मिठाईला रंग येण्यासाठी मेटानिल येलो आणि टारट्राजाइनचा वापर केला जातो. जे शरीरासाठी घातक असते.
माव्यापासून तयार झालेली मिठाई ओळखायची असल्यास माव्याचा छोट्याशा तुकड्यावर टिंचर आयोडिनचे तीन- चार थेंब टाका.
आयोडिनचे थेंब टाकलेला माव्याचा भाग काळा पडला तर मिठाई भेसळयुक्त आहे असं समजावे.
भेसळयुक्त मिठाई खाल्ल्याने उलटी, जुलाब यासारखे आजार होतात. यामुळे भेसळयुक्त मिठाई ओळखणे महत्वाचे आहे.आरोग्याची काळजी
मिठाई विकली गेली नाही तर तिचा उग्र वास येतो. यामुळेच आंबूस वास येत असलेली मिठाई विकत घेऊ नका.
खव्याचे पदार्थ विकत घेतल्यानंतर २४ तासांत तर बंगाली मिठाई ८ ते १० तासांत खावी.