Gauri Pujan Recipe 2023 Saam TV
लाईफस्टाईल

Gauri Pujan Recipe 2023 : लाडक्या गौराईसाठी बनवा टम्म फुगेल अशी खवा पोळी, तोंडात टाकताच विरघळेल; पाहा स्पेशल रेसिपी

How To Make khava poli : तुम्ही देखील गौराईसाठी नैवेद्य बनवण्याच्या बेतात असाल तर खवा पुरणपोळी बनवू शकता.

कोमल दामुद्रे

गौराईसाठी बनवा खवा पोळी

आज लाडक्या गौराईचे आगमन घरोघरी होईल. उद्या तिची मनोभावे पूजा आणि अर्चना केली जाईल. या काळात गौराईला गोडा-धोडाचा नैवेद्य दाखवला जातो. माहेरवाशीन आलेल्या गौराईला अनेक पदार्थ खाऊ घालतात.

२२ सप्टेंबरला ज्येष्ठागौरी पूजन केले जाईल. यानिमित्ताने जर तुम्ही देखील गौराईसाठी नैवेद्य बनवण्याच्या बेतात असाल तर खवा पोळी बनवू शकता. बरेचदा पोळी बनवताना ती फुटते किंवा मऊ बनत नाही. यामुळे आपण ती बनवण्याच्या भानगडीत पडत नाही. युट्यूबर 'सरिता किचन'ने सोप्या ट्रिकने बनवलेली पोळी पाहाच

1. साहित्य | Ingredients -

  • गव्हाचे पीठ ४०० ग्रॅम्स / ४ वाट्या | Wheat Flour 500 Grams / 4 Cups

  • मीठ चवीनुसार | Salt

  • तेल गरजेप्रमाणे | Oil

2. सारणासाठी | For Stuffing -

  • खवा ५०० ग्रॅम | ४ वाट्या | Khoya / Mava 500 Grams / 4 Cups

  • साखर (sugar) १५० ग्रॅम | ३/४ वाटी | Sugar 1 Cup / 200 Grams

  • वेलची पूड १/२ चमचा | Cardamom pw 1/2 tsp

  • पोळी लाटण्यासाठी पीठ | Wheat flour for dusting

  • पोळी भाजण्यासाठी साजूक तूप (Ghee) | Ghee for roasting poli

3. पद्धत

  • कणिक बनवण्यासाठी -

  • एका परात / प्लेटमध्ये गव्हाचे पीठ, चवीनुसार मीठ घ्या आणि चांगले मिसळा.

  • मऊ पीठ मळून घ्या, थोडे तेल (Oil) लावा आणि 15-20 मिनिटे ठेवा.

स्टफिंगसाठी -

  • कढई गरम करून त्यात खवा घालून एक मिनिट मंद आचेवर परतावे.

  • नंतर साखर घाला आणि साखर वितळण्यासाठी मंद आचेवर २-३ मिनिटे परतून घ्या.

  • आता मिश्रण सुमारे 9-10 मिनिटे परतून घ्या, तुम्हाला रंगात थोडासा बदल दिसेल आणि मिश्रण घट्ट होईल.

  • गॅस बंद करा, त्यात वेलची घाला आणि चांगले मिसळा.

  • मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्या. नंतर कणकेचे छोटे गोळे करून कोरड्या पिठात घाला.

  • त्यात थोडे सारण टाका आणि पोळी लाटून घ्या. पोळी मंद ते मध्यम आचेवर भाजून घ्या, भाजताना थोडं तूप लावा. स्वादिष्ट खवा पोळी तयार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

SCROLL FOR NEXT