Jowar Bhakri  Saam TV
लाईफस्टाईल

Jowar Bhakri : 'या' व्यक्तींनी खाऊ नये ज्वारीची भाकरी; अन्यथा आजार आणखी बळावू शकतो

Sorghum Side Effect : ज्या व्यक्तीचे वजन फार कमी आहे आणि वजन वाढवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत अशा व्यक्तींनी देखील ज्वारीची भाकरी आहारातून कमी करावी. जर ज्वारीची भाकरी खावी वाटली

साम टिव्ही ब्युरो

Jowar Effect On Health :

ज्वारीची भाकरी ही सर्वच घरांमध्ये खाल्ली जाते. नॉनव्हेज किंवा व्हेजमध्ये तिखट आणि चमचमीत भाजी खण्याऱ्या व्यक्ती जेवणात ज्वारीची भाकरी हमखास खातात. मात्र ज्वारीमध्ये असलेले काही गुणधर्म आणि जीवनसत्व ठरावीक आजार असलेल्या व्यक्तीसाठी आजार आणखी वाढवणारे ठरू शकतात. त्यामुळे आज त्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ.

ज्वरीमधील गुणधर्म

ज्वारी थंड, पचायला हलकी आणि रुक्ष म्हणजेच कोरडी असते. पचायला हलकी असल्याने अनेक व्यक्ती बाजरी ऐवजी ज्वारी जास्त प्रमाणात खातात. ज्वारीची भाकरी आपल्या शरीरातील पित्त आणि कफ यासारखे आजार कमी करते. मात्र वात दोष यामुळे वाढतात, अशी माहिती @justforhealth या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट करत देण्यात आली आहे.

या व्हिडिओमध्ये पुढे कोणत्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाऊनये या बाबत देखील माहिती देण्यात आली आहे. ज्या व्यक्तींना दमा, सर्दी खोकला, पॅरलीसिस, अपचन किंवा पोटात गॅस होतात त्यांनी ज्वारीची भाकरी जास्त प्रमाणात खाऊ नये.

ज्या व्यक्तीचे वजन फार कमी आहे आणि वजन वाढवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत अशा व्यक्तींनी देखील ज्वारीची भाकरी आहारातून कमी करावी. जर ज्वारीची भाकरी खावी वाटलीच तर त्यावर साजूक तूप किंवा लोणी यासोबत खावी. तसेच तुपात जिरे आणि हिंग पुड किंवा भाकरी कुस्करून दुधात खावी. यामुळे आरोग्याशी संबंधित अन्य समस्या जाणवत नाहीत.

अनेकदा आपल्या रोजच्या जेवणात आपण साधे, पौष्टिक असे अनेक घरगुती पदार्थ खात असतो. मात्र यातील कोणत्या पदार्थात कोणती घटक आहेत,किती प्रमाणात फायबर आहे, लोह किती आहे याबाबत आपल्याला पूर्ण माहिती नसते. त्यामुळे दमा किंवा अन्य साध्या साध्या आरोग्याशी निगडित समस्या आणखी बळावतात. त्यामुळे 6 महिन्यातून एकदा तरी हेल्थ चेकअप करणे उत्तम आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT