Jio Recharge Plan Saam Tv
लाईफस्टाईल

Jio Recharge Plan : Jio ची ग्राहकांसाठी खास ऑफर ! वर्षभराचा रिचार्ज अगदी कमी किंमतीत

Unlimited Calling : आपल्या बजेट मधील रिचार्ज पासून मोठ्या रिचार्जपर्यंत कंपनीच्या लिस्टमध्ये अनेक प्लॅन आहेत.

कोमल दामुद्रे

Jio Unlimited calling and data plan : रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी प्रत्येक रेंज मधील प्लान लॉन्च करत असतात. आपल्या बजेट मधील रिचार्ज पासून मोठ्या रिचार्जपर्यंत कंपनीच्या लिस्टमध्ये अनेक प्लॅन आहेत.

काही ग्राहक आपल्या बजेटनुसार छोटा रिचार्ज प्लान घेतात. तर काही ग्राहक महिनाभराचा रिचार्ज प्लान घेतात. अशातच अनेक लोक महिनाभराच्या रिचार्जमुळे कंटाळले आहेत.

लोकांना जास्त दिवस म्हणजे जास्त व्हॅलिडीटीचा रिचार्ज प्लॅन हवा असतो. जिओ तुमच्यासाठी अशा प्रकारचे प्लान घेऊन येते. आज आम्ही तुम्हाला जिओच्या 2545 च्या प्लॅन बद्दल सांगणार आहोत.

2545 चा हा वर्षभराचा प्लान जिओ तुमच्यासाठी घेऊन आला आहे. यात व्हॅलिडीटी 336 दिवसांची असते. म्हणजेच ग्राहकांनी एकदा रिचार्ज केला की, त्यांना वर्षभर रिचार्जकडे पाहण्याची किंवा रिचार्ज वारंवार भरण्याची गरज भासणार नाही. अकरा महिने आणि सहा दिवस रिचार्ज चालणार आहे.

1. फायदा (Benefits)

जियोच्या 2545 च्या या प्लानमध्ये 336 दिवसांची व्हॅलिडीटी मिळते. डेटानुसार या प्रीपेड प्लॅनमध्ये 1.5GB चा डेटा दिला जातो. म्हणजेच तुम्हाला यावर्षी सगळे मिळून 504 GB डेटा दिला जातो.

2. कॉलिंग

कॉलिंगबद्दल सांगायचे झालं तर ग्राहकांना अनलिमिटेड फ्री कॉलिंगचा (calls) फायदा घेता येतो. प्लानमध्ये दर दिवसाला शंभर एसेमेस फ्री मिळतात. या प्लान मधील दुसऱ्या गोष्टींबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सिक्युरिटी आणि जिओ क्लाऊड सोबत जिओचे सबस्क्रीप्शन फ्री मिळते.

जियोच्या 2545 च्या प्लॅनमध्ये प्रत्येक महिन्याचा हिशोब करायचा झाला तर, प्रत्येक महिन्याला 231 रुपये (Price) खर्च होत आहेत.

याशिवाय जिओने 2879 रूपये असणारा प्लान देखील आणला आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना 365 दिवसांची व्हॅलिडीटी मिळते. डेटा बद्दल सांगायचे झाले तर दिवसाला 2GB डेटा वापरायला मिळतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे गटाचे सर्व उमेदवार पिछाडीवर

Maharashtra Election Result : राज्यात कोणाला झटका, कोणाला धक्का? बाळासाहेब थोरात, सावंत ते सत्तार पिछाडीवर

Gulabrao Patil News : लाडक्या बहीणींचा आशीर्वाद मत पेटीतून आला आहे, गुलाबराव पाटील यांची मोठी प्रतिक्रिया

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, प्रवीण दरेकर यांचं मोठं वक्तव्य

Bribe Case : गुन्हा दाखल न करण्यासाठी ३० हजारांची लाच; राज्य उत्पादन शुल्कचे उपनिरीक्षकासह पंटर ताब्यात

SCROLL FOR NEXT