JIO Plans Saam Tv
लाईफस्टाईल

जिओचा जबरदस्त प्लान, एका रिचार्जमध्ये 4 मोबाइल फोन चालतील; नेटफ्लिक्स-अ‍ॅमेझॉन प्राइम मोफत मिळणार

जिओने देखील आपल्या वापरकर्त्यांसाठी अनेक विशेष पोस्टपेड ऑफर आणले आहे.

Shivani Tichkule

Jio Family Plan: टेलिकॉम कंपन्या प्रामुख्याने दोन प्रकारच्या मोबाइल (Mobile) सेवा देतात - पोस्टपेड आणि प्रीपेड. प्रीपेड रिचार्ज योजनांबाबत वेळोवेळी अनेक अपडेट्स येत राहतात. बहुतेक ग्राहक स्वतःसाठी प्रीपेड प्लॅन्स निवडत असल्याने, पोस्टपेड प्लॅन्सकडे कोणाच्याही इतके लक्षात जात नाही.

टेलिकॉम कंपन्या पोस्टपेड वापरकर्त्यांसाठी अनेक आकर्षक योजना आणि ऑफर देखील आणतात. इतर कंपन्यांप्रमाणे, जिओ देखील आपल्या वापरकर्त्यांसाठी अनेक विशेष पोस्टपेड ऑफर मिळतात.

यामध्ये कंपनीचा फॅमिली प्लॅन येतो, ज्यामध्ये संपूर्ण कुटुंब फक्त एका रिचार्जवर फोन वापरू शकतो. या योजना अशा लोकांसाठी एक चांगला पर्याय आहे ज्यांच्या कुटुंबात तीन ते चार मोबाइल वापर करते आहे.

हे देखील पाहा -

जिओचा सर्वात स्वस्त पोस्टपेड प्लान

जिओच्या पोस्टपेड प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर ग्राहकांना यामध्ये अनेक पर्याय मिळतात. कंपनीचा सर्वात स्वस्त पोस्टपेड प्लॅन 199 रुपयांचा आहे. असे असले तरी, 399 रुपयांचा प्लॅन हा एक चांगला पर्याय आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला कमी डेटा मिळत असला तरीही तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग, एसएमएस यासह अनेक OTT अ‍ॅप मोफत मिळणार आहे. या रिचार्जमध्ये जिओ अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळेल. मात्र 399 च्या या रिचार्जमध्ये तुम्हाला फॅमिली प्लॅनचा लाभ मिळणार नाही.

सर्वात स्वस्त फॅमिली प्लॅन

जिओचे फॅमिली प्लॅन 599 रुपयांपासून सुरू होतात. या रिचार्जमध्ये तुम्हाला 100GB डेटा मिळतो. डेटा लिमिट संपल्यानंतर, वापरकर्त्यांना 10 रुपये प्रति जीबी दराने डेटा मिळणार. हा प्लान 200GB डेटा रोलओव्हरसह येतो. दोन व्यक्ती या योजनेचा वापर करू शकतात.

याशिवाय ग्राहकांना Netflix, Amazon Prime आणि Disney + Hotstar चे सबस्क्रिप्शन देखील मिळेल. यासोबतच जिओ कॉम्प्लिमेंटरी अ‍ॅप्सचाही ग्राहक लाभ घेऊ शकतात. या रिचार्ज प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना Jio Prime साठी 99 रुपये वेगळे खर्च करावे लागतील.

तीन वापरकर्त्यांसाठी ही योजना

तीन वापरकर्त्यांसाठी जिओचा 799 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये, मुख्य वापरकर्त्याशिवाय, इतर दोन लोक या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. या रिचार्ज प्लॅनमध्ये एकूण 150GB डेटा वापरकर्त्याला मिळेल. डेटा लिमिट संपल्यानंतर यूजर्सला 10 रुपये प्रति जीबी दराने डेटा मिळेल.

या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मिळेल. या रिचार्ज प्लॅनमध्ये देखील ग्राहकांना Netflix, Amazon Prime आणि Disney + Hotstar चे सबस्क्रिप्शन देखील मिळेल.

चार लोकांसाठी एक रिचार्ज

जर तुम्ही चार वापरकर्त्यांसाठी प्लान शोधत असाल तर त्याची किंमत 999 रुपये आहे. या प्लानमध्ये तुम्हाला 200GB डेटा मिळेल. यात 500GB ची डेटा रोलओव्हर मर्यादा आहे. डेटा लिमिट संपल्यानंतर यूजर्सला 10 रुपये प्रति जीबी दराने डेटा मिळेल.

यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसचा लाभ मिळणार आहे. इतर प्लॅन्सप्रमाणे, वापरकर्त्यांना या रिचार्ज प्लॅनमध्ये OTT प्लॅटफॉर्म आणि Jio अ‍ॅप्सचाही लाभ घेता येणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking Video: बापरे बाप... चक्क काकूंनी सापांना कपड्यांसारखे धु धु धुतले; व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल...

Vastu Tips: वास्तुनुसार 'या' मूर्ती घरात ठेवा, सुख शांती मिळेल

Maharashtra News Live Updates: योगींच्या 'बटेंगे तो कटेंगे' घोषणेला देवेंद्र फडणवीस यांचं समर्थन

Winter Drinks: हिवाळ्यात हे आरोग्यदायी पेय प्या आणि शरीराला ठेवा उबदार

असंख्य घरांमध्ये लपलीये एक मांजर; तुम्ही १० सेकंदात शोधून दाखवाच!

SCROLL FOR NEXT