Jio Netflix And Prime Video Recharge Plan Saam Tv
लाईफस्टाईल

Jio Recharge Plan: जिओचा जबरदस्त प्लॅन; 30 दिवस फ्री ट्रायल, Netflix आणि Prime Video ही मोफत; सोबत 5G डेटाही मिळणार

Jio Netflix Recharge Plan: जिओचा जबरदस्त प्लॅन; 30 दिवस फ्री ट्रायल, Netflix आणि Prime Video ही मोफत; सोबत 5G डेटाही मिळणार

Satish Kengar

Jio Netflix And Prime Video Recharge Plan:

रिलायन्स जिओ युजर्ससाठी अनेक प्लॅन ऑफर करत आहे. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये प्रीपेड प्लॅनची कोणतीही कमतरता नाही. तसेच जर आपण पोस्टपेड प्लॅन्स बोललो तर, कंपनी अनेक जबरदस्त पर्याय ऑफर करत आहे. जिओचा 699 रुपयांचा पोस्टपेड प्लान यापैकी एक आहे.

कंपनी 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये तीन फॅमिली सिम देत आहे. यामध्ये तुम्हाला इंटरनेट वापरण्यासाठी 100 GB डेटा मिळेल. फॅमिली सिमसाठी कंपनी या प्लॅनमध्ये दरमहा 5 जीबी अतिरिक्त डेटा देत आहे. विशेष बाब म्हणजे या प्लॅनच्या यूजर्सना कंपनी अनलिमिटेड 5G डेटा देखील देत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या प्लॅनमध्ये दररोज 100 मोफत एसएमएस मिळतात. यामध्ये तुम्हाला देशभरातील सर्व नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंग देखील मिळेल. जिओचा हा प्लॅन अनेक अतिरिक्त फायद्यांसह येतो. यामध्ये तुम्हाला नेटफ्लिक्स (बेसिक) आणि अॅमेझॉन प्राइम व्हिडिओचे फ्री सब्सक्रिप्शनही मिळेल. याशिवाय कंपनी या प्लॅनमध्ये Jio TV आणि Jio Cinema ला मोफत अॅक्सेस देत आहे. कंपनीचा हा प्लॅन 30-दिवसांच्या फ्री टेस्टसह येतो.

कंपनी आपल्या 399 रुपयांच्या फॅमिली प्लॅन आणि 599 रुपयांच्या प्लॅनमध्ये फ्री टेस्ट देखील देत आहे. 399 रुपयांचा प्लॅन तीन फॅमिली सिमसह येतो. यामध्ये तुम्हाला इंटरनेट वापरण्यासाठी एकूण 75 जीबी डेटा मिळेल. अतिरिक्त सिम प्लॅनमध्ये कंपनी दरमहा 5 जीबी अतिरिक्त डेटा देत आहे. या प्लॅनमध्ये एलिजिबल युजर्सला अनलिमिटेड 5G डेटा मिळेल.  (Latest Marathi News)

या प्लॅनमध्ये दररोज 100 मोफत एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगही मिळत आहे. प्लॅनमध्ये तुम्हाला Jio TV आणि Jio Cinema चा फ्री अॅक्सेस. 599 रुपयांच्या प्लॅनबद्दल सांगायचे तर, तुम्हाला यामध्ये फॅमिली कनेक्शन मिळणार नाही. प्लॅनमध्ये अतिरिक्त फॅमिली डेटा देखील दिला जात नाही. हा प्लान प्लॅन युजरला अनलिमिटेड डेटा ऑफर करतो. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, 100 मोफत SMS आणि Jio TV आणि Jio Cinema च्या फ्री अॅक्सेसचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

Maharashtra Politics : ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का! बड्या नेत्यानं हाती धरलं एकनाथ शिंदेंचं 'धनुष्यबाण'

SCROLL FOR NEXT