Jio recharge  Saam Tv
लाईफस्टाईल

जिओ ग्राहकांना मोठा झटका; 'हा' प्रीपेड प्लॅन केला दीडशे रुपयांनी महाग

जिओ ग्राहकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. रिलायन्सच्या जिओ ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. जिओने एक प्रीपेड प्लॅन बंद केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

नवी दिल्ली : जिओ (Jio) ग्राहकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. रिलायन्सच्या (Reliance) जिओ ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. जिओने एक प्रीपेड प्लॅन बंद केला आहे. जिओच्या या निर्णयामुळे जिओ ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. ( jio prepaid plans Latest News In Marathi )

जिओने ७४९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन बंद केला आहे. त्यामुळे त्या प्रीपेड प्लॅनच्या (Prepaid Plan) बदल्यात ८९९ रुपये मोजावे लागणार आहे. हा निर्णय जिओ ग्राहकांना मोठा झटका मानला जात आहे. कारण या निर्णयामुळे जिओ ग्राहकांना त्या प्रीपेड प्लॅनसाठी १५० रुपये अधिक मोजावे लागणार आहे.

टेलिकॉमटॉकच्या माहितीनुसार, जिओ हे ग्राहकांना ७४९ रुपये आणि ८९९ रुपयांचा दोन्ही प्लॅन ऑफर करत होते. या दोन्ही प्लॅनमध्ये एकसारखे प्लॅन होते. मात्र, जिओने ७४९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांना ८९९ रुपयांचा प्लॅन विकत घ्यावा लागणार आहे. जिओ कंपनीने या प्रीपेडबद्दल अधिकृत माहिती त्यांच्या वेबसाईटवर दिली आहे. एकंदरीत जिओ कंपनीच्या निर्णयामुळे ग्राहकांना त्या प्रीपेड प्लॅनसाठी १५० रुपये अधिक मोजावे लागणार आहे.

या प्लॅनमध्ये जिओ ग्राहकांना २८ दिवसांमध्ये दर दिवशी २ जीबी हाय-स्पीड डेटा मिळणार आहे. हाय-स्पीड संपल्यानंतर ग्राहकांना हाय-स्पीड ६४ केबीपीएस मिळणार आहे. या प्लॅनमुळे एकूण वैधता ३३६ दिवसांची आहे. तसेच ग्राहकांना अनलिमिटेड कॉलची देखील सुविधा मिळते. तसेच ग्राहकांना जिओचे काही अॅप्स देखील सब्सक्रिप्शन करण्यास मिळणार आहे. या प्लॅनमध्ये दरदिवशी पन्नास एसएमएस आणि दोन जीबी इंटरनेट मिळणार आहे.

Edited By - Vishal Gangurde

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

खाकीवर डाग! ज्यानं १८० मुलींचं लैंगिक शोषण केलं, त्या अयान अहमदला पोलिसांनी भरवला केक; व्हिडिओ व्हायरल

PM Matru Vandana Yojana: गर्भवती महिलांना मिळतात ₹११०००; सरकारची पीएम मातृ वंदना योजना आहे तरी काय?

Maharashtra News Live Update: अकोल्यात 13 लाख 80 हजार किमतीचं ड्रग्ज'चं जप्त

Weight Loss Tips: मखाने की शेंगदाणे? वजन कमी करण्यासाठी काय आहे सगळ्यात बेस्ट?

हृदयद्रावक! वाढदिवसाच्या दिवशीच रिलस्टार सोनाली जाधवचा शेवट; अनैतिक संबंधातून प्रियकरानेच संपवले

SCROLL FOR NEXT