Jio Data Plan Saam Tv
लाईफस्टाईल

Jio युजर्ससाठी ऑफर्सचा पाऊस! 50 पैशांमध्ये मिळणार 1GB डेटा, आजच करा रिचार्ज

कोमल दामुद्रे

Jio Air Fiber Plan :

रियालन्स जिओ ही देशातील सगळ्यात मोठी टेलिकॉम कंपनी असून प्रत्येक महिन्याला ग्राहकांसाठी नवनवीन रिचार्ज ऑफर करत असते. अशातच फेब्रुवारी महिन्यात जिओने युजर्ससाठी दोन नवीन रिचार्ज ऑफर केले आहे.

जिओच्या या बूस्टर पॅकमध्ये वापरकर्त्यांना 500GB पर्यंत डेटाचा लाभ मिळतो आहे. हे प्लान प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही वापरकर्त्यांसाठी आणले आहे. जिओने सध्या देशभरात 5G ची सेवा सुरु केली आहे. जिओने (Jio) ब्रॉडबँड वापरकर्त्यांसाठी हे डेटा बूस्टर पॅक लॉन्च केले आहेत.

जिओ एअर फायबरसाठी लॉन्च केलेल्या या दोन्ही नवीन डेटा बूस्टर पॅकमध्ये वापरकर्त्यांना ५० पैसे खर्च करुन १जीबी डेटाचा लाभ मिळेल. यामध्ये दोन बूस्टर प्लान आहेत. ज्याचा फायदा (Benefits) ग्राहकांना होईल. जाणून घेऊया जिओच्या या बूस्टर प्लानबद्दल.

1. 101 रुपयांची योजना

जिओच्या एअर फायबरच्या या ब्रॉडबँडचा प्लान १०१ रुपये (Price) + GST सह युजर्सना मिळत आहे. या प्लानमध्ये युजर्सना १०० जीबी डेटाचा फायदा मिळणार आहे. सध्याच्या या प्लानची वैधता संपेपर्यंत त्याचा वापर करता येईल. या प्लानमध्ये ग्राहकांना व्हॉईस कॉलचा कोणताही फायदा मिळणार नाहीये. यामध्ये ग्राहकांना सुरु असलेल्या प्लाननुसार इंटरनेट स्पीडचा लाभ मिळणार आहे.

2. 251 रुपयांची योजना

जिओ एअर फायबरचा हा डेटा बूस्टर प्लान २५१ रुपये + GST सह मिळतो आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना ५०० जीबी डेटाचा लाभ मिळणार आहे. म्हणजेच हा डेटा प्लान ५० पैशांमध्ये १ जीबी डेटा मिळतोय. जिओ एअर फायबरसाठी हे दोन्ही पॅक १ टीबी संपल्यानंतर मिळू शकतात. हा प्लान प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही वापरकर्त्यांसाठी आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi : निक्कीच्या प्रेमात अरबाजची तहान भूक हरपली, मनधरणी करत म्हणाला…

Relationship Tips : रोजच्या भांडणांमुळे नातं तुटण्याची भीती वाटतेय? आजपासून 'या' टिप्स नक्की फॉलो करा

IND vs BAN: कर्णधार सूर्यकुमार यादवचा मोठा खुलासा; पहिल्या सामन्यात 'हा' फलंदाज करणार ओपनिंग!

Marathi News Live Updates : डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का

Walnut Benefit: दररोज अक्रोड खाण्याचे चमत्कारिक फायदे

SCROLL FOR NEXT