Jaya Kishori Thoughts  Saam Tv
लाईफस्टाईल

Jaya Kishori Thoughts : तुमच्या जिवलग मित्रापासूनही लपवा या 5 गोष्टी, अन्यथा यशस्वी होण्यात येईल अडचण

Thoughts Of Jaya Kishori On Success : जया किशोरी या भारतातील प्रसिद्ध प्रेरक वक्ता आणि कथाकार आहेत. आज लाखो लोक त्यांचे चाहते आणि श्रोते आहेत. हे लाखो लोक जया किशोरीचे सोशल मीडियासह विविध प्लॅटफॉर्मवर प्रोत्साहन घेतात. जया किशोरी यांचे खरे नाव जया शर्मा आहे.

Shraddha Thik

Jaya Kishori :

जया किशोरी या भारतातील प्रसिद्ध प्रेरक वक्ता आणि कथाकार आहेत. आज लाखो लोक त्यांचे चाहते आणि श्रोते आहेत. हे लाखो लोक जया किशोरीचे सोशल मीडियासह (Social Media) विविध प्लॅटफॉर्मवर प्रोत्साहन घेतात. जया किशोरी यांचे खरे नाव जया शर्मा आहे. तिच्या गुरु दीक्षेदरम्यान, तिला गुरूंनी किशोरी या उपाधीने संबोधले होते. तेव्हापासून तिचे नाव जया किशोरी झाले.

जया किशोरीने सांगितलेल्या गोष्टी लोकांचे आयुष्य बदलून टाकणाऱ्या आहेत. अशा स्थितीत जया किशोरी यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या एखाद्या व्यक्तीने कधीही इतरांसोबत शेअर (Share) करू नयेत. जर त्याने असे केले तर त्याला जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. चला जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुमच्या जिवलग मित्रापासूनही लपवल्या पाहिजेत, नाहीतर तुम्हाला आयुष्यात यश मिळणार नाही.

जया किशोरीच्या म्हणण्यानुसार, तुम्ही तुमच्या लव्ह लाईफबद्दल इतरांना कधीही सांगू नये कारण त्यात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे तुम्हाला नंतर लाज वाटू शकते.

जया किशोरी यांच्या मते, एखाद्या व्यक्तीने त्याच्या पुढच्या टप्प्याबद्दल कोणालाही सांगू नये. असे केल्याने तो कोणत्याही अडचणीतून बाहेर पडू शकणार नाही.

जया किशोरी यांच्या मते, व्यक्तीने घरातील समस्या इतरांना कधीही सांगू नये. असे केल्याने तुमच्या घरात इतरांचा हस्तक्षेप वाढू शकतो आणि तुम्ही हसण्याचे पात्र बनू शकता.

जया किशोरी यांच्या मते, एखाद्या व्यक्तीने आपली कमाई आणि त्याचा स्रोत इतरांना सांगू नये. लोक या महत्त्वाच्या माहितीचा लाभ घेऊ शकतात. यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते.

जया किशोरी यांच्या मते, एखाद्याच्या प्लानबद्दल इतरांना कधीही सांगू नये. तुमची प्लान गुप्त ठेवली नाही तर काम यशस्वी होण्यात अडचण येऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rave Vs Party : पार्टी आणि रेव्हमध्ये काय फरक आहे?

Parenting Tips: मुलांना आपले मित्र बनवायचंय? तर फॉलो करा 'या' टिप्स

Dabeli Bhaji Recipe : दाबेलीसाठी परफेक्ट भाजी कशी बनवाल? वाचा सीक्रेट रेसिपी

Maharashtra Live News Update: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्या: सदाभाऊ खोत यांची मागणी

Shubman Gill: शुभमन गिलने इतिहास रचला, विराट कोहली आणि सर डॉन ब्रॅडमॅनचा रेकॉर्ड मोडला

SCROLL FOR NEXT