Jaya Kishori Thoughts : तरुणांनो, बोलण्याआधी विचार कराच! जया किशोरींनी दिला सल्ला

Inspiring Quotes For Youngster : तलवारीपेक्षा शब्दांचे घाव हे अतिशय खोचक असतात. याविषयी जया किशोरींनी मत मांडले आहे. त्या म्हणतात की, हल्लीची तरुण पिढी बोलण्याआधी विचार करत नाही.
Jaya Kishori Thoughts
Jaya Kishori ThoughtsSaam Tv
Published On

Motivational Thoughts :

आपल्यापैकी अनेकांना पटकन व्यक्त होण्याची वाईट सवय असते. त्यामुळे समोरच्याचे न ऐकता आपण सहज व्यक्त होतो. मात्र आपल्या सवयींमुळे अनेक गैरसमज, वाद, अपमान सहन करावे लागतात.

परिस्थिती वेगळी असते आणि आपण चुकीच्या पद्धतीने व्यक्त होतो. मग नंतर मागितलेल्या माफीला किंमत उरत नाही. कारण तलवारीपेक्षा शब्दांचे घाव हे अतिशय खोचक असतात. याविषयी जया किशोरींनी मत मांडले आहे. त्या म्हणतात की, हल्लीची तरुण (Youngster) पिढी बोलण्याआधी विचार करत नाही. ती सरळ पद्धतीने व्यक्त होते. कोणतीही गोष्ट करताना त्याचा आधी शांतपणे विचार करा. जाणून घेऊया तरुणांसाठी त्यांनी कोणता सल्ला दिला आहे त्याविषयी.

  • प्रत्येक अडखळ ही सावधगिरी बाळगण्याचा इशारा आहे.

  • स्वत:ची तुलना कधीच कोणाशी करु नका. प्रत्येकाचे आयुष्य वेगळे आहे. त्यामुळे अडचणींचा सामना प्रत्येकाला करावा लागतो.

  • प्रत्येकांने नम्रतेने वागा. तुमची नम्रता तुम्हाला महान बनवते.

  • बोलण्यापूर्वी एकदा नाही तर हजारदा विचार करा.

  • जीवनात आनंदी राहायचे असेल तर कोणाकडूनही कशाची अपेक्षा करु नका.

  • इतरांचा आदर करायला शिका. ज्यामुळे कोणत्याही कठीण प्रसंगी तुम्हाला त्याचे फळ मिळेल.

Jaya Kishori Thoughts
Happiness Mantra : जया किशोरींनी दिला आनंदी राहण्याचा मंत्र, या 5 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा
  • यश (Success) मिळवणे काही कठीण नाही. कठीण आहे तर यश टिकवणे.

  • आई-वडिलांचे संस्कार कधीही विसरु नका. त्यांना आत्मसात करण्याचा प्रयत्न करा.

  • राग आल्यानंतर स्वत:वर संयम राखायला शिका. ज्यामुळे अनेक प्रश्न सुटतील.

  • इतरांच्या वाईटपणामुळे स्वत:चा चांगुलपणा कधीही विसरु नका.

  • जे आजपर्यंत गमावलं आहे ते कधीच तुमचं नव्हतं पण तुम्हाला जे हवयं ते मिळवण्यासाठी पुन्हा नव्याने कामाला लागा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com