Japanese Technique Of Walking saam tv
लाईफस्टाईल

Japanese Technique Of Walking: 10,000 पावलं चालण्यापेक्षाही चांगले रिझल्ट्स देईल जपानी वॉकिंग टेकनिक; डॉक्टरांनी सांगितली वॉकिंगची पद्धत

Walking Benefits: पायी चालणं हा कधीही एक चांगला व्यायाम मानला जातो. मात्र एक जापानी वॉकिंग टेकनिक सध्या ट्रेंडमध्ये आहे. ही पद्धत नेमकी काय आहे आणि ती कशी करावी याबाबत आपण जणून घेऊया.

Surabhi Jayashree Jagdish

फीट आणि फाइन राहण्यासाठी पायी चालणं हा एक सर्वोत्तम मार्ग मानला जातो. वजन कमी करण्यासाटी आणि नियंत्रणात ठेवण्यासाठी अर्धा तास चालावं असं तज्ज्ञांचं मत आहे. कोणत्याही वयोगटातील व्यक्तीने चाललंच पाहिजे. चालण्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहणं, पचन चांगलं राहणं हे फायदे होतात.

सामान्यपणे १०००० पावलं दररोज चालणं फायद्याचं मानलं जातं. मात्र गॅस्ट्रोइंट्रेलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांच्या सांगण्यांनुसार, जापानी वॉकिंग टेकनिक १०००० पावलं चालण्यापेक्षाही अधिक फायदेशीर आहे. शिवाय याचे फायदे देखील अधिक मिळत असल्याचं समोर आलं आहे.

काय आहे जपानी वॉकिंग टेकनिक? | Japanese Technique Of Walking

डॉ. सेठी यांच्या म्हणण्यानुसार, आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी जपानी लोकं एका नव्या टेकनिकचा वापर करतात. या टेकनिकचं नाव इंटरवल वॉकिंग (Interval Walking) आहे. या टेकनिकमध्ये पहिल्यांदा ३ मिनिटं हळूहळू चालण्याचा सल्ला दिला जातो. आणि त्यानंतर ३ मिनिटं वेगाने चालावं

दररोज अर्धा तास जरी इंटरवल वॉकिंग केलं तरी तुम्हाला त्याचे कमालीचे रिझर्ट्स मिळू शकतात, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. या पद्धतीच्या वॉकिंगने ब्लड प्रेशर चांगलं राहतं, स्ट्रोकचा धोका कमी होतो, मूड इंप्रूव होतो त्याचप्रमाणे रात्रीची झोपही चांगली लागते. यामुळे हृदयाचं आरोग्यही जपलं जात असल्याचं समोर आलं आहे.

इंटरवल वॉकिंगला कशी कराल सुरुवात?

इंटरवल वॉक करण्यासाठी ३ ते ५ मिनिटं कंफर्टेबली चालणं सुरु केलं पाहिजे. त्यानंतर ब्रिस्क वॉक म्हणजेच वेगाने चाललं पाहिजे. यानंतर तुम्ही ३ त ५ मिनिटं कूल डाउन झालं पाहिजे. अशा पद्धतीने तु्म्ही वॉक केलं तर आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते.

काय काळजी घ्याल?

ज्यावेळी तुम्ही अशा पद्धतीने वॉक कराल तेव्हा तुमच्यासोबत पाण्याची बाटली अवश्य ठेवा. जेणेकरून तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता होणार आहे. यामध्ये सरळ रस्त्यावर चालण्यापेक्षा चढणाच्या रस्त्यावर हा वॉक करणं तुम्हाला फायदा देईल. याशिवाय तुमची लाईफस्टाईल सुधारल्यास याचे अधिक चांगले रिझल्ट्स तुम्हाला मिळतील.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Police News : आलिशान कारमधून आले अन् टपरी चालकाला उचलून नेलं, मुंबईतील २ पोलिसांना बेड्या

Maharashtra Politics: मीरा-भाईंदरमध्ये भाजपला मोठा धक्का, मराठी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्याचा मनसेत प्रवेश|VIDEO

Abhijeet Khandkekar Wife: फेसबुकवर मैत्री नंतर लग्न केलं; कोण आहे अभिजीत खांडकेकरची पत्नी?

कार मंदिरात घुसली; ५-६ जणांना चिरडलं, दोघांचा मृत्यू, पायऱ्यांवर रक्ताच्या थारोळ्या | Chhatrapati Sambhajinagar

The Traitors Winner: उर्फी जावेद आणि निकिता लूथर ठरले 'द ट्रेटर्स'चे विजेते; ट्रॉफीसह मिळाणार कोट्यावधींचे बक्षीस

SCROLL FOR NEXT