Diwali Festival Saam tv
लाईफस्टाईल

Diwali Special Diwa: तेल नाही..वीज नाही; तरी पेटवा पणत्या

तेल नाही..वीज नाही; तरी पेटवा पणत्या

Rajesh Sonwane

दिवाळी सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या अनुषंगाने मार्केटही फुलेले आहे. बाजारात दिवाळी (Diwali) खरेदीचा जोर चढला आहे. यात प्रामुख्‍या दिपोत्‍सवात (Diwali Festival) दारापुढे दिवे लावले जातात. याकरीता पणत्‍या खरेदी केल्‍या जात आहेत. परंतु, यंदाची दिवाळी जरा खास अन्‌ हटके होवू शकते. कारण आता तेल किंवा विजेवर चालणारे दिवे नाही; तर पाण्यावर जळणाऱ्या दिव्यांची रंगत आहे. (Tajya Batmya)

दिपोत्‍सवात प्रामुख्‍याने प्रत्‍येकजण घर सजावटीवर भर देत असतो. घराला रंगरंगोटी सोबतच तोरण, घरावर आकर्षक लाईटींग, कंदील लावले जातात. यामुळे मार्केटमध्‍येही दिव्‍यांचा लखलखाट पहावयास मिळत आहे. यात यंदा भर पडली ती आकर्षक अशा पाण्यावर लागणारे दिवे. दिवाळीसाठी आपण पाण्यावर तरंगणारे दिवे म्हणजेच पाण्यावरचे दिवे हे आकर्षण ठरत आहे.

तेला ऐवजी टाका पाणी

पाण्यावरच्‍या दिव्यांचे वैशिष्ट्य म्हणजे हे दिवे फक्त पाण्याने जळतात. ज्याला तेल किंवा वीज लागत नाही. प्लास्टिकचा बनलेला हा दिवा पाणी टाकल्‍यावर प्रज्‍वलित होतो. फुलांचा, पणत्‍यांचा आकार असलेले हे दिवे सुंदर दिसतात. मातीच्‍या पणत्‍यांसोबतच या दिव्यांनाही यंदा बाजारात मोठी मागणी आहे. त्यांची किंमत ४० ते ६० रुपयांपर्यंत आहे.

सेन्‍सरने दिवा जोडलेला

सदरच्‍या दिव्यांमध्ये लहान सेल बसवलेले असून जे सेन्सरने दिवा जोडलेला आहे. हे दिवे पाणी टाकताच ते तेजस्वीपणे जळू लागतात. सदरचे दिवे दिल्लीहून मागवण्यात आल्‍याचे विक्रेत्‍यांकडून सांगण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: केस गळती कमी करुन १ महिन्यात केस होतील दुप्पट लांब; मेथी दाण्याच्या करा असा वापर

Dreams Fact : रात्री पडलेलं स्वप्न सकाळी आठवतच नाही? समोर आलं थक्क करणारं कारण

Mumbai Crime: मुंबई हादरली! ९ वीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, ६ जणांकडून अश्लिल व्हिडीओद्वारे ब्लॅकमेल

Skin Care: चेहरा ड्राय झालाय आणि ओपन पोर्स वाढलेत? मग, चेहऱ्यावर रोज स्प्रे करा हे घरी तयार केलेले फेस मिस्ट

Maharashtra News Live Update: पोलादपुर महाबळेश्वर जोडणारा आंबेनळी घाट 16 ऑगस्ट पर्यंत बंद राहणार

SCROLL FOR NEXT